नागपूर: एखादा व्यवसाय असलेल्या कुटुंबात जन्म झाला त्या व्यवसायाच्या नावावर त्याची जात, धर्म ठरवला जात आहे. अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी सर्व समाज एकत्रित होण्याची गरज आहे. सर्व समाज एक झाला तर समाज शक्तिशाली होईल, समाज शक्तिशाली झाला तर राष्ट्र शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले.

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री व सामाजिक समरसता अभियान प्रमुख देवजी भाई रावत लिखित ‘अस्पृश्यता सामाजिक विकृती समस्या और समाधान’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष ॲड. आलोक कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय समरसता गतीविधी प्रमुख श्यामाप्रसाद, हिंदू बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भय्यासाहेब विधाने, विहिंपचे मुंबई क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे, प्रांत मंत्री प्रशांत तितरे आदी मान्यवर उपस्थित होते.

maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
pm modi rally in pune pm modi mega roadshow in pune ahead of maharashtra assembly elections
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’

हेही वाचा… धक्कादायक! नागपूर पोलीस आयुक्तांचे चक्क बनावट फेसबुक अकाऊंट

व्यवसायानुसार जातींचा जन्म झाला. आज निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचे मूळ तिथे आहे. आपण चर्मकाराला कनिष्ठ मानत असू तर चामड्याच्या वस्तू वापरणारे आपण श्रेष्ठ कसे? स्वच्छता कर्मचाऱ्यांना जर कमी लेखतो तर अस्वच्छता करणारे चांगले कसे, हा प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा. आपण मनुष्याच्या कार्याच्या स्वरूपावरून त्याला उच्च व नीच मानण्यास सुरुवात केली. ही एक विकृती असून ती दूर करण्याची गरज आहे, असेही भैय्याजी जोशी म्हणाले.

हेही वाचा… पेंशनधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेणार, प्रफुल्ल पटेल यांचे आश्वासन

आलोककुमार म्हणाले, गेल्या साठ वर्षांत विश्व हिंदू परिषदेने हिंदुत्वाला केंद्रस्थानी आणत कुणीही त्याचा अपमान करू शकणार नाही, ही भावना निर्माण केली. मात्र, आजही जे हिंदू समाज संपवण्याच्या धमक्या देताहेत ते नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी देवजी रावत यांनी पुस्तकाची माहिती दिली. प्रास्ताविकात गोविंद शेंडे यांनी विहिंपच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले. आभार अमोल शेंडे यांनी मानले.