गडचिरोली : नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील मन्नेराजाराम येथील माजी सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. बुधवारी सायंकाळी गॅरा टोला येथे माजी सरपंच रंगा मडावी यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गडचिरोलीत सर्वत्र पूरस्थिती असताना नक्षलवाद्यांनी माजी सरपंचाची हत्या केल्यामुळे सर्वत्र भीती व दहशतीचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा