नागपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. महायुतीला मोठा धक्का बसला अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनगरागमन केले. राज्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीमधील प्रमुख तीन पक्ष भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना मिळून तब्बल २३२ जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला असा तसा फक्त ५० जागांचाच आकडा गाठता आला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.
आज पुन्हा एकदा एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे ते त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शुक्रवारी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कन्हान येथील सभेदरम्यान प्रवेश करणार आहेत.
उद्धव ठाकरेंकडून बैठकांचे सत्र
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या या उपक्रमाला ऑपरेशन टायगर हे नाव देण्यात आले आहे. शिवसेनेचे ऑपरेशन टायगर हळूहळू यशस्वी होताना दिसत आहे. कारण ठाकरे गटाच्या अनेक नगरसेवकांचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताना दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. या घडामोडींची गंभीर दखल आता उद्धव ठाकरे यांच्याकडूनही घेण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने पक्षाच्या नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात आहे. परंतु, त्यानंतर नागपूर ग्रामीणचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे ते त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यासह शुक्रवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.