अकोला: सदनिका विक्रीच्या नावाखाली लाखो रुपये घेऊनही प्रत्यक्ष सदनिका अन्य दुसऱ्या व्यक्तीलाच विकून माजी प्राप्तिकर अधिकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती विजयसिंग सोळंके याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. सोळंके हे अकोला जिल्हा भाजपचे कार्यकारिणी सदस्य व माजी सचिव आहेत. मुंबईतील गावदेवी पोलिसांच्या पथकाने अकोला जिल्ह्यातील कुटासा गावात जाऊन सोळंकेला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील शुभ कर्म गृह निर्माण सोसायटीतील कर्मक्षेत्र इमारतीत एक सदनिका होती. वन बीएचके असेलली ही सदनिका ५० लाखात विकत घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाचे तत्कालिन अधिकारी विजय कुमार कोहाड यांनी २०१३ मध्ये तयारी दर्शविली. त्यानुसार सप्टेंबर २०१३ मध्ये कोहाड आणि सोळंके यांच्यात सहमती झाल्यानंतर कोहाड यांनी सोळंकेला सदनिका विकत घेण्यासाठीची रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यास सुरुवात केली. कोहाड यांनी ठरल्याप्रमाणे वर्षभरात सोळंकेला ३२ लाख २५ हजार रूपये दिले. सदनिकेच्या मूळ मालक या सोळंके याच्या मावशी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व वारसा हक्क प्रक्रियेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोळंके यांना या सदनिकेचा ताबा मिळाला होता. सोसायटीकडून या सदनिकेला ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही सदनिका कोहाड यांच्या नावाने हस्तांतरित करून विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे दोघांमध्ये ठरले होते. सोळंके याच्याशी कोहाड यांचा जुना परिचय असल्याने ही सहमती मौखिक पातळीवर होती.

हेही वाचा… “आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता…” नितेश राणे म्हणतात…

मात्र, त्यानंतर गेली १० वर्षे सदनिकेची विक्री नोंद करण्यास आणि ताबा देण्यास सोळंके याने टाळाटाळ सुरू केली. सोसायटीची एनओसी मिळाली नाही असे कारण देत त्याने जवळपास १० वर्षे चालढकल केली. त्यानंतर ३० एप्रिल २०२२ ला पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही सदनिका आरोपी सोळंके यांनी २०१८ मध्ये परस्पर दुसऱ्याला विकल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत २३ मार्च २०२३ ला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठांची परवानगी मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी सोळंके अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कुटासा या आपल्या मूळ गावी असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर गावदेवी पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुटासा येथील आरोपीच्या मूळ घरी जाऊन अटक केली. यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस आरोपीला घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.