भंडारा : तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आज मुंबई येथे शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता चरण वाघमारे हे तुमसर विधानसभा मतदारसंघातून तूतारी हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार असलेल्या चरण वाघमारे यांनी यापूर्वी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. मात्र आंध्र प्रदेशात सत्ता बदल झाल्यानंतर बीआरएसचे भवितव्य धोक्यात आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणूक माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी चरण वाघमारे हे काँग्रेसचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र काँग्रेसमधील काही लोकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. दरम्यान येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघमारे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. ते अपक्ष निवडणूक लढतील असे वाटत असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या संपर्कातही ते होते. अखेर आज मुंबई येथे त्यांनी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी वाघमारे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वाघमारे यांच्या या प्रवेशामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. असे झाल्यास दोन राष्ट्रवादींमध्ये या ठिकाणी लढत होणार हे स्पष्ट आहे.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : आगलाव्या भाषणावर आयोग गप्प राहील…
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात

हे ही वाचा…देवी विसर्जनादरम्यान तलावातील खड्ड्यात पडून तिघांचा मृत्यू

भंडाऱ्यात आमदार परिणय फुके यांची एन्ट्री झाल्यानंतर चरण वाघमारे आणि त्यांच्यात कायम छत्तीसचा आकडा राहिला. त्यानंतर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत वाघमारे यांना भाजपाने पक्षातून काढले. त्यानंतर आता २०२४ त्यांची आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन वेगवेगळे गट स्थापन झाल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार असला तरी, कुठल्याही पक्षाचा त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. तुमसर विधानसभा मतदार संघावर सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. अशातच चरण वाघमारे यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केल्याने तुमसर विधान सभेची तिकीट वाघमारे यांना दिल्यास महविकास आघाडीची ही जागा निश्चित निघणार असे बोलले जात आहे.

हे ही वाचा…धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीत राजकीय नेत्यांची अनुपस्थिती तरीही मंचावर झाला मोठा वाद…

राष्ट्रवादीला विरोध केला म्हणून पक्षातून काढले

२०१९ मध्ये भाजपने माझी तिकीट नाकारली. त्याचा परिणाम भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपला भोगावा लागला. त्यामुळे चूक लक्षात येताच देवेंद्र फडणवीस यांनी माझे निलंबन रद्द करून मला पुन्हा पक्षात घेतले. त्यानंतर झालेल्या भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करण्यास विरोध केला म्हणून भाजपने मला पून्हा पक्षातून काढले. मात्र भाजप केवळ स्वार्थाचे राजकारण करीत असल्याने मी पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असे वक्तव्य चरण वाघमारे यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी केले.