अकोला (पातूर) : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये गर्दीत धक्का लागून काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर खाली पडल्या. यात ठाकूर किरकोळ जखमी झाल्या. मात्र, त्यांनी न थांबता पदयात्रेत चालणे सुरूच ठेवले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

हेही वाचा… नागपूर: प्राध्यापकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी धवनकरांनी दाखवले व्याजाने पैसे देण्याचे आमिष

हेही वाचा… का बंद पडणार ‘सुदामा टॉकीज’?; प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचा फटका

भारत जोडो यात्रा काल, १६ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात दाखल झाली. पातूर येथून आज सकाळी ६.३० वाजता यात्रेला प्रारंभ झाला. पातूर ते बाभुळगावदरम्यान चांगलीच गर्दी उसळली होती. यात्रेमध्ये सहभागी यशोमती ठाकूर यांना गर्दीत धक्का लागला. त्यामुळे त्या रस्त्यावर कोसळल्या. यामध्ये त्यांना हाताला थोडे खरचटले आहे. मात्र, त्यांनी न थांबता यात्रेतील आपला प्रवास कायम ठेवला. ‘आतापर्यंत अनेक धक्के सहन केले आहेत, अशा छोट्या धक्क्याने काही फरक पडत नाहीत,’ असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Story img Loader