गोंदिया : रानडुकरांची शिकार करण्याकरिता लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहात अडकून तीन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या शिकारप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी चार आरोपींना अटक केली आहे. दशरथ ब. नांदगाये, अरुण राऊत, देवराज ग. मानकर आणि  भाऊलाल न. राऊत ( सर्व देवरी तालुका ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता सहायक वनसंरक्षक राठोड यांनी वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवरी एफडीसीएमच्या बोरगाव बीटमध्ये ४८१  वनपरिक्षेत्रात ही घटना घडली. सदर क्षेत्र वनविभागाचे राखीव क्षेत्र आहे. तीन दिवसांपूर्वी विद्युत प्रवाहाचा वापर करून तीन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात एक मादी बिबट आणि दोन नर बछड्यांचा समावेश आहे. रानडुक्कर पकडण्याकरिता विद्युत प्रवाह लावल्याचे आणि त्यात बिबट्यांचा मृत्यू झाल्याची कबुली चारही आरोपींनी दिली आहे. आरोपींनी जवळपास १९०-२०० मीटर विद्युत प्रवाह शिकारीकरिता वापरल्याचे निदर्शनास आले आहे.