ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघादरम्यान जामठा मैदानावर सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर चक्क मैदानात बसून सट्टेबाजी करण्यात येत होती. गुन्हे शाखेने चौघांनाही मैदानातून सट्टेबाजी खेळताना अटक केली. ही कारवाई आज क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी दुपारी १ वाजता करण्यात आली.
हेही वाचा >>>नागपूर: विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा चुका; जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील जामठा स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यावर क्रिकेट सट्टेबाजांची जोरदार फिल्डिंग सुरू होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला अलर्ट मोडवर ठेवले होते. नागपुरातील बुकींकडून क्रिकेट सामन्यावर कोट्यवधीची सट्टेबाजी होत असते. त्यामुळे कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त एम. सुदर्शन आणि पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांचे पथक तैनात होते.
हेही वाचा >>>नागपूर विद्यापीठाची निविदा प्रक्रिया वादात; विशिष्ट कंपनीच्या लाभासाठी इतरांना जाचक अटी?
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जामठा मैदानावर पोलीस निरीक्षक पर्वते यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्यांपैकी काहींची सुक्ष्म निरीक्षण केले. त्यांना ४ जणांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यांना संशय येतात चौघांनाही काहीही कळण्यापर्वीच ताब्यात घेण्यात आले. त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. चौघांनीही क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजांना मदत करीत असल्याची कबुली दिली. आरोपी हे मैदानातून थेट बुकींना फोनवरून माहिती पुरवित होते. मुख्य आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला असून आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात ठेवण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.