यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथे महिला मेळाव्यासाठी येत आहे. त्यांच्या कार्यक्रमासाठी यवतमाळनजीक भारी शिवारात येथे भव्य मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सभामंडपाचे काम सुरू असताना त्यातील एक भाग कोसळल्याने चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, रविवारी दुपारी घडली.

भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ४२ एकर खुल्या जागेवर हा मेळावा होणार असून २६ एकरवर सभा मंडप उभारला जात आहे. त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना त्याचा पिलर जमिनीतून निखळला त्यामुळे त्याचे खांब खाली असलेल्या तीन क्रेन वर कोसळले. या घटनेत चार कामगार जखमी झाले असून सुदैवाने ते बचावले. जखमी मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले आहेत.

simhastha kumbh mela
साधुग्राम अतिरिक्त जागेसाठी मेरीच्या जागेचा विचार; गोदाकाठावर पाच नवीन पूल, सिंहस्थ कुंभमेळा बैठक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
India to Play Against South Africa in U19 Womens T20 World Cup 2025 What is the Match Timing
U19 Women’s T20 World Cup Final: भारताचा महिला संघ U19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत कोणाविरूद्ध भिडणार? जाणून घ्या सामन्याची वेळ
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Congress Manifesto
Congress Manifesto : महिलांना दरमहा अडीच हजार, ५०० रुपयांत सिलिंडर, अन् तरुणांना…; दिल्लीकरांसाठी काँग्रेसकडून आश्वासनांची खैरात!
Bhagyashree Fund , Maharashtra Kesari,
पुण्याची भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी, म्हणते ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय
Gashmeer Mahajani
“नाळ जोडली गेलेली…”, गश्मीर महाजनी महिला चाहत्यांबद्दल म्हणाला, “लहानपणापासून माझ्यावर महिलांचे…”

हेही वाचा…ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा पंतप्रधान मोदींकडून गौरवपूर्ण उल्लेख

दरम्यान, येथील कार्यक्रमात कोणतीही उणीव राहू नये यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी जवळपास तीन लाख महिला उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्टेज, मंडप, पार्किंग, बैठक व्यवस्था, पाणी व्यवस्था, सुरक्षा आदींचा गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. मंडप उभारणीच्या कंत्राटदारांकडून उभारणीच्या कामाची माहिती घेतली. मंडप वेळेत आणि चांगल्या पध्दतीने उभा राहिला पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या.

Story img Loader