चंद्रपूर : नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मृतक सर्वजण नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – एकाही कंत्राटदाराला घरी बोलावले नाही, भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, काय म्हणाले गडकरी?
कारमधील एकूण सहापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी व महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले होते. मृतकांमध्ये रोहन विजय राऊत (३०), रूषिकेश विजय राऊत (२८), गिता विजय राऊत (४५), सुनिता रूपेश फेंडर (४०), प्रभा शेखर सोनवणे (३६), यामिनी रूपेश फेंडर (९) यांचा समावेश आहे. सर्व जण नागपूरातील आहेत. कार कापून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.