नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २७१ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नव्या प्रशासकीय भवनासाठी सेतू केंद्र, खनिकर्म, संजय गांधी निराधार भवन, शहर तहसील कार्यालयाची इमारत पाडली जाणार आहे. सध्याचे विभागीय आयुक्त कार्यालय हे संरक्षित इमारत म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> लय भारी! सोळा शासकीय सेवा मिळणार आपल्याच घरी… , राज्यातील पहिलाच ‘सेवादुत’ उपक्रम वर्ध्यात

उपराजधानीतील राज्य सरकारचे सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २७१ कोटीचे प्रशासकीय भवन बांधण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यावर नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत नुकतीच मंजुरी दिली. इमारतीचे बांधकाम महामेट्रो करणार आहे.

हेही वाचा >>> मागासवर्गीयांचा ३० हजार कोटींचा निधी अखर्चित; अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विकासाला खीळ

नवीन इमारत बांधकामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शहर तहसील कार्यालय, सेतू केंद्राची इमारत, खनिकर्म विभागाची इमारत, संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय तोडण्यात येणार असून त्या जागेवर नवीन इमारत उभी राहणार आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयासह विभागीय आयुक्त कार्यालय स्थानांतरित करण्यात येणार आहे. तसेच, दोन्ही प्रमुख कार्यालयासह या कार्यालयातील इतर विभागही समाविष्ट करण्यात येणार आहे. नव्या इमारतीच्या आराखड्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर विशेष प्रयत्न केले. उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर होण्याच्या उद्देशाने काही सुधारणाही आराखड्यात करण्यात आल्या. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four old buildings will be demolished for the new administrative building in nagpur cwb 76 zws
Show comments