गोंदिया : तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील गिरधारी साठवणे यांचे विहिरीत असलेली मोटार पाण्याने बुडून जाण्याची शक्यता असल्यामुळे ही मोटर काढण्याकरता त्यांचा मुलगा खेमराज गिरधारी साठवणे (वय ५०), प्रकाश भोगाडे (वय ५०), सचिन यशवंत भोंगाडे (वय ३०), महेंद्र राऊत (वय २८) वर्षे हे विहिरीत उतरले असता त्यांना विजेचा धक्का लागून एकावर एक खाली पडून चौघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक दुर्दैवी घटना आज सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिरोडा तालुक्यातील सरांडी या गावात गिरधारी साठवणे यांची स्वतःच्या घरी विहीर आहे, गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे विहिरीचे पानी तुडुंब होत असल्यामुळे विहिरीतील विद्युत मोटार पाण्यातून वर करण्यासाठी खेमराज गिरधारी साठवणे हे विहिरीत उतरून मोटर वर करीत असताना त्यांना विजेचा शॉक लागला आणि ते विहिरीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या बाजूचे सचिन भोंगाळे आणि प्रकाश भोंगाळे हे दोन्ही काका पुतणे वाचवण्यासाठी विहिरीत उतरले असता त्यांनासुद्धा विजेचा धक्का लागून तेसुद्धा विहिरीत पडले.

हेही वाचा – राज्य ‘सेट’चा निकाल केवळ साडेसहा टक्के, मुलांनी टाकले मुलींना मागे

त्यांच्याच बाजूला असलेला महेंद्र राऊत याने आवाज ऐकून तोसुद्धा विहरीजवळ आला आणि वाचविण्यासाठी विहिरीत गेला असता त्यालासुद्धा विजेचा धक्का लागला आणि चारही लोकं विहिरीत पडले असल्याची घटना सरांडी या गावात घडली आहे.

सध्या सचिन गिरधारी साठवणे, प्रकाश भोंगाडे, सचिन भोंगाडे, महेंद्र राऊत या चारही जणांचे मृतदेह विहिरीत असून सध्या विहिरीच्या बाहेर चारही लोकांना काढण्यात आलेले नाही. सध्या विद्युत धक्का की विहिरीमध्ये गॅस भरली याबाबत संभ्रम कायम आहे. घटना स्थळी पोलीस पथक, प्रशासन, अग्नीशमन पथक दाखल झालेले आहे. पण घटना विद्युत प्रवाहामुळे घडली की विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे घडली याचा तपास केला जात आहे. त्यानंतरच सदर मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.

हेही वाचा – यवतमाळ : जिल्ह्यात बोगस खत शेतकर्‍यांच्या माथी, ५०० बॅगचा साठा होल्ड केल्याचा दावा

घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी बघण्याकरता गर्दी केली असून घटनास्थळावर पोलीस निरीक्षक देविदास कठाळे व तहसीलदार गजानन कोकुड्डे पोहचले असून मदत कार्य सुरू आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four people died due to electric shock in a well in sarandi sar 75 ssb