लोकसत्‍ता टीम

अमरावती : वैष्णोदेवीचे दर्शन करून पंजाबमधील जालंधर येथे मुलाकडे जाणाऱ्या चिखलदरा तालुक्‍यातील सोलामूह येथील बेलसरे कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. सोमवारी (६ मे रोजी) पहाटे ३:३० वाजता हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

गानू रामलाल बेलसरे (६०), लोकेश गानू बेलसरे (३४), अनिशा लोकेश बेलसरे(२४),निहारिका लोकेश बेलसरे ११ महिने सर्व रा. सोलामुह ता. चिखलदरा अशी मृतांची नावे आहेत. शिवराम कासदेकर ५२, सरस्वती शिवराम कासदेकर रा. नयाखेडा, ता. अचलपूर अशी जखमींची नावे आहेत.

आणखी वाचा-वीज देयकांत पैसे वाचवायचे असतील तर ‘ही’ आहे योजना…

बेलसरे कुटुंबीय हे आपल्या वाहनाने प्रवास करत होते. दरम्यान आज पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत त्‍यांचे वाहन रस्त्याच्‍या बाजूला एका झाडावर जाऊन आदळले. मृतांमध्‍ये अकरा महिन्यांच्या चिमुकलीसह सेवानिवृत्त वडील आणि शिक्षक मुलाचा समावेश आहे. तर दोघे गंभीर जखमी आहे.

बेलसरे कुटुंबीय जालंधर येथे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत मुलाकडे गेले होते. वैष्णोदेवीवरून येत असताना हा अपघात झाला. संबंधित अपघात करणाऱ्या वाहनाला कुठल्याच क्रमांकाची नंबर प्लेट नव्हती. सर्व मृतदेह हे जालंधर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.