लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : वैष्णोदेवीचे दर्शन करून पंजाबमधील जालंधर येथे मुलाकडे जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील सोलामूह येथील बेलसरे कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. सोमवारी (६ मे रोजी) पहाटे ३:३० वाजता हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गानू रामलाल बेलसरे (६०), लोकेश गानू बेलसरे (३४), अनिशा लोकेश बेलसरे(२४),निहारिका लोकेश बेलसरे ११ महिने सर्व रा. सोलामुह ता. चिखलदरा अशी मृतांची नावे आहेत. शिवराम कासदेकर ५२, सरस्वती शिवराम कासदेकर रा. नयाखेडा, ता. अचलपूर अशी जखमींची नावे आहेत.
आणखी वाचा-वीज देयकांत पैसे वाचवायचे असतील तर ‘ही’ आहे योजना…
बेलसरे कुटुंबीय हे आपल्या वाहनाने प्रवास करत होते. दरम्यान आज पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत त्यांचे वाहन रस्त्याच्या बाजूला एका झाडावर जाऊन आदळले. मृतांमध्ये अकरा महिन्यांच्या चिमुकलीसह सेवानिवृत्त वडील आणि शिक्षक मुलाचा समावेश आहे. तर दोघे गंभीर जखमी आहे.
बेलसरे कुटुंबीय जालंधर येथे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत मुलाकडे गेले होते. वैष्णोदेवीवरून येत असताना हा अपघात झाला. संबंधित अपघात करणाऱ्या वाहनाला कुठल्याच क्रमांकाची नंबर प्लेट नव्हती. सर्व मृतदेह हे जालंधर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.