लोकसत्ता टीम
चंद्रपूर: राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चिमूर या पतसंस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक, कार्यालयीन लिपीक, अभिकर्ता यांना गुंतवणूकदारांची ७ कोटी ६५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे संचालक अरुण संभाजी मेहरकुरे, अतुल अरुण मेहरकुरे, मारोती वाल्मीक पेंदोर, अमोल अरुण मेहरकुरे या चार जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली.
राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चिमूर या संचालक मंडळ, व्यवस्थापक, कार्यालयीन लिपिक, अभिकर्ता यांनी संगणमत व कट रचून चिमूर तालुका अंतर्गत येणारे मजूर, भाजीपाला, मुरमुरे विक्री करणारे व इतर छोटे व्यवसायिक या गोरगरीब गुंतवणूकदारांकडून दैनिक, एफ.डी., आर.डी., बचत मध्ये रोख रक्कमेच्या ठेवी स्वीकारून संस्थेचे उपविधीचे उल्लंघन करून स्वीकारलेल्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर सुद्धा गुंतवणूकदारांचे मूल्यवान रोखा ‘संगणकीय खाते’ विवरणमध्ये गुंतवणूकदारांना नुकसान, क्षती करण्याच्या उद्देशाने खोटा, बनावटीकरण इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला.
हेही वाचा… ताडोबातील ‘माया’ आणि ‘रुद्रा’ची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’; पर्यटक झाले ‘दिवाने’
तसेच गुंतवणूकदारांचे मूळ बचत खाते, संस्थेचे ५ वर्षांचे दैनंदिन जमा, विड्रॉल, ट्रॉन्सफर पावत्या गहाळ करुन पुरावा नष्ट केलेला आहे. त्यामुळे वित्तीय संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक, कार्यालयीन लिपिक, अभिकर्ता यांनी संस्थेचे ७ कोटी ६५ लाख ५२ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली असून गुन्ह्यात सहभाग असलेले आरोपी अरुण संभाजी मेहरकुरे, अतुल अरुण मेहरकुरे, मारोती वाल्मीक पेंदोर, अमोल अरुण मेहरकुरे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.