दिवाळी हंगामा कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांकडून आयोजकांना मारहाण करण्यात आली आहे. तरुणांना समजवायला गेलेल्या भंडारा पंचायत समितीच्या उपसभापतींसह चार आयोजकांना तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात मध्यरात्री घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर: ओमान एअरच्या विमानाचे नागपुरात ‘इमरजन्सी लँडिंग’

जखमींवर भंडारा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पाच तरुणांवर कारधा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात दिवाळीनिमित्त ग्रामीण लोककलेचा ‘हंगामा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्यरात्री तिथे कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यासाठी पंचायत समिती उपसभापती प्रशांत खोब्रागडे व इतर चार लोक गेले असता यावरून दोन गटात सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर दोन्ही गटात राडा होऊन तरुणांनी मोठ्या लाठ्याकाठ्यांनी मारहाण सुरू केली.

हेही वाचा >>>नागपूर: जरिपटका रेल्वे उड्डाण पुलाविरोधात महिलांचे आंदोलन

यात प्रशांत खोब्रागडे (५२), राजेंद्र साखरवाडे (३४), प्रशांत माकडे (२७) यांच्यासह १२ वर्षीय आदेश देशमुख या चौघांना जबर मारहाण झाली. जखमींना भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी प्रशांत खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी आशीष पडोळे (२५), कमलाकर अहिर (४२), निखिल पाणबुडे (२८), अक्षय साखरवाडे (२५) यासह एका १६ वर्षीय अल्पवयीन बालकावर गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four people including the deputy chairman were beaten up in the diwali hungama program amy