नागपूर : ‘डायमंड एक्चेंज’ नावे सुरु असलेल्या ‘ऑनलाइन गेमिंग’ अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यवधीची फसवणूक प्रकरणात आरोपी सोंटू जैनवर कारवाईचा फास आवळत चालला आहे. त्यामुळे सोंटू आणि त्याचे नातेवाईक गुन्ह्यातून बाहेर येण्यासाठी धडपड करीत आहेत. तक्रारदार विक्रांत अग्रवाल यांना सोंटूची बहिण आस्था जैन, मैत्रिण रुबी जैन आणि विनय नावाच्या नातेवाईकाने तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून धमकी दिली. तसेच तक्रारदार विक्रांत यांच्या कारला एका भरधाव कारने धडक मारली व त्यानंतर संबंधित कारचालक वाहनासह फरार झाला. या प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल यांना ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात ओढून त्यांची ५८ कोटींनी फसवणूक करणाऱ्या सोंटू जैनविरोधात जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याअगोदर तो दुबईला निघून गेला होता. अटक टाळण्याचे बरेच प्रयत्न झाल्यावर सोंटू भारतात परतला व त्याची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, तक्रार मागे घेण्यासाठी अग्रवाल यांच्यावर विविध माध्यमातून दबाव आणण्यात येत आहे. सोमवारी ते गिट्टीखदान येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेले होते. तेथून त्यांना लक्ष्मीनगरला जायचे असल्याने ते उड्डाणपुलावरून रहाटे कॉलनीत आले व तेथून जनता चौकात रात्री दहा वाजता एका इंडिका कारने त्यांच्या कारला मागून धडक दिली. अपघातानंतर अग्रवाल यांच्या कारचे नुकसान झाले.

हेही वाचा >>>आमदार नरेंद्र भोंडेकर अपात्र होणार का ? मुंबईतील सुनावणीला हजर

कारचालक वेगाने फरार झाला. सोंटू जैनच्या प्रकरणाशी संबंध असल्याने दुखापत करण्यासाठी ही धडक मारण्यात आल्याची शक्यता असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे. त्यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच शांतीनगरातील अन्वेश ऊर्फ अभिनव नावाच्या मित्राला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्या घरी पोलिसांनी छापा घातला.