लोकसत्ता टीम

यवतमाळ: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून परत येत असताना घुगूसजवळ वाहन दुभाजकावर आदळून उभ्या ट्रकला जबर धडक दिली. या भीषण अपघातात मारेगाव येथील चौघेजण जागीच ठार झाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजता दरम्यान घडली.

pune koyta attack
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, मार्केटयार्ड परिसरात चौघांकडून कोयत्याने वार; उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
terrible accident in glass factory in Yevlewadi area Four laborers died on the spot in this accident
येवलेवाडीत काचेच्या कारखान्यात अपघात, चार कामगारांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी
Three people died due to lightning in Kalyan Murbad
कल्याण, मुरबाड येथे वीज पडून तीन जणांचा मृत्यू
man dies due to electric shock during paigambar Jayanti procession
पुणे : पैगंबर जयंती मिरवणुकीत वीज वाहिनीच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू
injured young man died in clash in Sambarewadi near Sinhagad
सिंहगडाजवळ सांबारेवाडीतील हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू
Clash between two groups and stones pelted during immersion in Jalgaon Jamod and Shegaon
गणेश विसर्जनाला गालबोट अन शोककळाही! जळगाव , शेगाव मध्ये संघर्ष; एकाचा अपघाती, युवकाचा बुडून मृत्यू
Clash between two groups in Sambarewadi near Sinhagad youth killed in firing
सिंहगडाजवळील सांबरेवाडीत दोन गटात हाणामारी, गोळीबारात तरुणाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

अपघातात रफीक नबी वस्ताद शेख, त्यांची पत्नी संजिदा रफीक शेख, युसूफ नबी वस्ताद शेख, त्यांची पत्नी मुमताज युसूफ शेख रा.मारेगाव हे जागीच ठार झाले. या अपघाताने मारेगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. हे कुटुंब गुरुवारी आपल्या नातेवाईकांच्या साक्षगंधाला राजुरा (जि. चंद्रपूर) येथे गेले होते. ते आज मारेगावकडे बोलेरो (क्रमांक एम.एच.२९, बी. सी. ६३२१) ने येत असताना घुग्गुस नजीक हे वाहन दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या उभ्या ट्रकला धडकले.

हेही वाचा… अकोला : पत्नीने शेतीवर कामासाठी जाण्यास दिला नकार, पतीने संतापून…

या अपघातात बोलेरो वाहनाचा चक्काचूर होऊन यातील मारेगावचे दोन सख्ख्ये भाऊ व त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयावह होता की वाहनाचे प्रत्येक भाग गॅस कटरने कापून मृतकांना बाहेर काढण्याचे नियोजन सुरू आहे. दरम्यान मृत रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे, तर युसूफ शेख याच्या पश्चात दोन मुली आहे.