गडचिरोली : भामरागड तालुक्यात माजी सभापतीची हत्या करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांना दुसऱ्याच दिवशी जबर हादरा बसला. दोन जहाल नक्षलवादी जोडप्याने आत्मसमर्पण केले. या चौघांवर २८ लाख रुपयांचे बक्षीस होते. तीन दशकांपासून नक्षलचळवळीत राहून ८२ गुन्हे करणारा विभागीय समिती सदस्य अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर याचा यात समावेश आहे.

अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर (६३, रा. अर्कापल्ली, ता. अहेरी), त्याची पत्नी व क्षेत्रीय समिती सदस्य वनिता दोरे झोरे (५४, रा. कोरनार ता. एटापल्ली),  प्लाटून ३२ सदस्य साधू लिंगू मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर (३० रा. तुमरकोडी ता. भामरागड) व पत्नी   मुन्नी पोदीया कोरसा (२५, रा. सिलीगेंर ता. कोळा, जि. सुकमा, छत्तीसगड) अशी त्यांची नावे आहेत. बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर याच्यावर १६ लाख, वनिता झोरे हिच्यावर ६ लाख, साधू मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर याच्यावर ४ लाख तर मुन्नी कोरसा हिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून  बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर व त्याची पत्नी वनिता झोरे यांना १५ लाख रुपये तसेच साधू   मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर व त्याची पत्नी मुन्नी कोरसा यांना ११ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे.

Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
bombay HC slaps Rs 1 lakh cost on ED for case on realtor
विकासकावर खोटा खटला; पुराव्यंशिवाय कारवाई, न्यायालयाचे ताशेरे

महिनाभरात १७ नक्षलवाद्यांची शरणागती

२०२२ पासून आतापर्यंत ५६० जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर महिनाभरातच १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला.  नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, नक्षलविरोधी अभियानचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ ९ बटालियनचे कमांडन्ट शंभू कुमार यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले.

बालन्नावर ८२ गुन्हे बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर याने १९९१ मध्ये अहेरी दलममधून सदस्य पदावर भरती होऊन नक्षलवादी चळवळीत प्रवेश केला. ३१ चकमक, १७ जाळपोळ व ३४ इतर अशा एकूण ८२ गुन्ह्यांत त्याचा सहभाग आहे.  त्याची पत्नी वनिता झोरे  हिच्यावर १ गुन्हे दाखल आहेत. १९९३ मध्ये एटापल्ली दलममधून तिने गुन्हे चळवळीतील कारकीर्दीची सुरुवात केली. साधू  मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर याच्यावर ४ गुन्हे दाखल असून २०१५ पासून तो नक्षलवादी चळवळीसाठी काम करतो. त्याची पत्नी मुन्नी पोदीया कोरसा हिनेही २०१५ मध्येच माओवादी चळवळीत पाऊल ठेवले. ६९५ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर गेल्या २० वर्षांत आत्मसमर्पण केले आहे.

Story img Loader