चंद्रपूर : जंगलाला लागून असलेले मार्ग वन्यप्राण्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर-मूल महामार्गावरील डोनी फाट्याजवळ दोन दुर्मिळ चांदी अस्वलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. यापूर्वी मूल जवळ आणि विसापूर टोल नाक्याजवळ अपघातात चांदी अस्वलांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात ४ चांदी अस्वलांचा मृत्यू झाल्याची नोंद हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीने केली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर-मूल मार्गावर रोजच एखादा पक्षी, साप, तृणभक्षी, मांसभक्षी प्रकारातला वन्यप्राणी मृत्यूमुखी पडतो. हा राष्ट्रीय महामार्ग ९३० क्रमांकाचा असून, या राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी उपशमन योजना राबविण्यात येणार आहे. परंतु, हे काम रखडून पडले असून, वन्यजीवांना याची किंमत मोजावी लागत आहे. हाच महामार्ग पुढे गडचिरोली-धानोरा- मुरमगावपर्यंत जातो. धानोरा भागात सुद्धा संख्या कमी होत चाललेल्या तडसाचा अनेकदा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीने दिली. घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, अमित देशमुख, ओमकार मत्ते, संजीवणी पर्यावरण संस्थेचे उमेश झिरे, तन्मय झिरे, वनविकास महामंडळाचे सहाय्यक वनरक्षक आर. एस. कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी बोथे, वनरक्षक कुमरे उपस्थित होते. तर मुल व विसापूर येथेही चांदी अस्वलाचा मृत्यू आला. चार चांदी अस्वलाचा अपघातात मृत्यू आल्याने या मार्गावर वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याची मर्यादा असतानाही सुसाट वेगात वाहन धावत असल्याने वन्य जीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.