लोकसत्ता टीम
वाशीम : दिवाळी आणि छट सणानिमित्त दक्षिण मध्य रेल्वे कडून सिकंदराबाद-रक्सोल दरम्यान विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. ह्या गाड्या निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, प्रयागराज चौकी, बक्सर, मुझफ्फरपुर मार्गे धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७००१ सिकंदराबाद ते रक्सोल ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून १९ नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी १० :३० वाजता सुटणार आहे. निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, प्रयागराज चौकी, बक्सर, मुझफ्फरपुर मार्गे रक्सोल येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता पोहचणार आहे.
आणखी वाचा-पत्नीने विचारले, दारु का पित बसता? पतीने रागाच्या भरात…
तर गाडी क्रमांक ०७००२ रक्सोल ते सिकंदराबाद ही विशेष गाडी रक्सोल येथून २१ नोव्हेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी १९ : १५ वाजता सुटेल आणि नियोजित मार्गानेच सिकंदराबाद येथे गुरुवारी दुपारी १४ : ३० वाजता पोहोचेल. ही जनसाधारण विशेष रेल्वे गाडी आहे. या गाडीत एकूण २२ जनरल डब्बे राहणार असल्याने सामान्य प्रवाश्यांची विशेष व्यवस्था होणार आहे.