वर्धा : हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय, समुद्रपूर व सेलू ग्रामीण रुग्णालय तसेच गिरड आरोग्य केंद्रात चार रुग्णांना उपचार नाकारण्यात आले. अखेर सेवाग्राम रुग्णालयाच्या वाटेवर असताना चौघेही दगावले. सीमा किशोर मेश्राम, बोधेश्र्वर वागदे, अश्विनी उमेश कापसे, सुशीला पांधरे अशी मृतांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – रेल्वे प्रवास करताय, मग हे वाचाच! २२ ते २५ जुलैदरम्यान..

हेही वाचा – गडचिरोली : मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला

निसर्गसाठी फाउंडेशनचे प्रवीण कडू यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. ते म्हणाले की याबाबत ६ व १७ जुलैला प्रशासनास अवगत करण्यात आले. चार मृत्यू सर्पदंशाने झाले पण प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. चौकशी नाही. उपचारात दिरंगाई सुरूच आहे. असा दंश झाल्यास कुठे उपचार मिळतील, हे कोणी सांगत नाही. असे मृत्यू थांबविण्यासाठी ठोस उपाय नाहीत. मग मृत्यूचे दार अढळ का, असा सवाल सर्पमित्र प्रभाकर कोळसे, महेंद्र महाजन, यशवंत शिवणकर, प्रशांत भोयर आदींनी देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.