लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीम: मंगळवारी रात्री शहरातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. बुधवारी सकाळी दुकानाचे शटर वाकलेले दिसून आल्याने चोरी झाल्याचा संशय आला. याप्रकरणी चार ठिकाणी चोरी झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

शहरात गत काही दिवसापूर्वी मुख्य बाजार पेठ असलेल्या पाटणी चौकातील कापड दुकानात चोरीची घटना घडली होती. त्यातच मंगळवारी रात्री शहरातील शिवाजी शाळे समोरील ताडपत्रीचे दुकान, पतंजली, खामगाव जिन येथील किराणा दुकान व रेल्वे स्टेशन जवळील किराणा दुकान यासह शहरातील इतर ठिकाणी चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून मुद्देमाल व काही रक्कम चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून किती रुपयाची चोरी झाली याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

आणखी वाचा-गोंदिया : वाघांच्या संरक्षणासाठी वनविभाग लागला कामाला; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

शहरात एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. शहरात अवैधरित्या बंदुका बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी काही युवकावर कारवाई केली होती. तर नीमजगा परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून दुचाकीवर व सायकलीवर गस्त दिली जात आहे. क्यू आर कोड उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही शहरात एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

सीसीटिव्ही कॅमेरे नावापुरतेच

शहरातील पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहेत. मात्र, ते बंद अवस्थेत असल्याची माहिती असून वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four theft incidents in washim city in one night pbk 85 mrj