जिल्ह्यातील पवनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सावरला जंगलात एका गुरख्याला एकाच वेळी चार वाघांचे दर्शन झाले. या चारही वाघांचे कुटुंब एकत्र फिरत असल्याच्या दुर्लभ क्षणांचे चित्रीकरण त्याने त्याच्या भ्रमणध्वनीमध्ये केले. जंगलात वाघाचे अस्तित्व आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
उमरेड-करांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या सावरला जंगल क्षेत्रात बुधवारी परिसरातील काही गुराखी गुरे चराईसाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सावरला वनपरिक्षेत्रातील तलाव क्रमांक २ जवळ या वाघांचे दर्शन झाले.
हेही वाचा : जागतिक खाद्यान्न दिनानिमित्त विष्णू मनोहर तयार करणार २ हजार किलोंचा चिवडा
पवनी ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर या वाघांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांनी येथून आवागमन करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.