लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा: ‘तुला रेल्वेत नोकरी करायची का? आम्ही तुला नोकरी लावून देवू,’ असे आमिष देत एका १८ वर्षीय तरुणीवर दोघांनी अत्याचार केला. त्यानंतर एकाने बळजबरीने तिच्याशी लग्न करून तिला ओडिशा राज्यात पळवून नेले. ही घटना तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बालाघाट जिल्ह्यातील कुम्हली येथील तरुणीला आरोपी मुशरान खान (२२, रा. गोसनगर, बालाघाट) व रोहित भोयर (२३, रा. कोरणी, गोंदिया), या दोघांनी रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगितले. त्यानंतर १० मार्च रोजी तरुणीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर असल्याने ती बालाघाट येथे गेली होती. तिच्या परीक्षा केंद्राबाहेरच आरोपी तिची वाट पाहत उभे होते. पेपर सुटल्यानंतर त्यांनी तिला गोंदियाला आणले. नंतर गोंदियावरून तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे आणून तिच्यावर अत्याचार केला. त्याच दिवशी आरोपी रोहित भोयर याने बळजबरीने तिच्याशी लग्न करून ओडिशाच्या रेंगडीला नेले. पीडित मुलीच्या आई-वडिलानी तिचा शोध घेतला असता त्यांना त्यांची मुलगी रेंगडी येथे एका घराबाहेर दिसली. पीडितेने कुटुंबीयांना आपबिती सांगितली.

आणखी वाचा- वीज कर्मचाऱ्यांच्या ‘अपघात विमा योजने’च्या वाढीव शुल्कावरून संताप!

पीडिता १२ एप्रिल रोजी बालाघाट पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेली. मात्र, घटनास्थळ सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सिहोरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना दोन आरोपींना ताब्यात घेतले असून १८ एप्रिलपर्यंत दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ज्याचा तपास सिहोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश गोसावी करत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud and torture with young woman in the name of getting a job in the railways ksn 82 mrj