अनिल कांबळे

स्वत:ला समाज माध्यम विश्लेषक म्हणून घेणारा नागपुरातील अजित पारसे याने अनेकांना कोट्यवधी रुपयाने गंडा घातला. श्रीमंत लोकांमध्ये वावर, नेत्यांशी सलगी यामुळे अल्पकाळातच प्रकाशझोतात आलेला हा महाठग नेमका आहे तरी कोण ? नागपुरातील स्वावलंबीनगरात राहणार अजित पारसे याच्याकडे माहिती तंत्रज्ञानासंबंधीचा कोणतीही पदवी नाही. त्याने काही महिने पुण्यात आणि हैद्राबादमध्ये नोकरी केली.तेथून तो पुन्हा नागपुरात आला. त्याने स्वत:ला सोशल मिडिया विश्लेषक घोषित केले.

हेही वाचा >>>नागपूर : तोतया ‘सोशल मीडिया’ विश्लेषक अजित पारसेवर फसवणुकीचा गुन्हा ; अनेकांकडून उकळली कोटींची खंडणी

कसा नावारुपास आला पारसे
पारसेने हेमंत नावाच्या एका व्यक्तीला हाताशी घेतले. त्याच्या माध्यमांतून नागपुरातील काही संघ, संघटना, संस्थांमध्ये ओळख वाढविली. तसेच हेमंतने त्याला नागपुरातील राजकीय नेत्यांसोबत ओळख करून दिली.दोघांनीही पैसे कमविण्यासाठी अनेकांना जाळ्यात ओढणे सुरू केले. पंतप्रधान कार्यालयातून कोटींचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक डॉक्टर्स, प्राध्यापक, संस्थासंचालक आणि बेरोजगार युवकांची फसवणूक केली.

हेही वाचा >>>नागपूर : झटपट वजन कमी केल्यास केस गळतीचा धोका ! ; त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा महल्ले यांचे मत

पारसेच्या जाळ्यात अडकले कोण
बडकस चौकातील डॉ. राजेश मुरकुटे यांना पीएमओ कार्यालयातून होमिओपँथी महाविद्यालय काढण्यासाठी कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी २ कोटी, सीबीआयची कारवाई थांबविण्याच्या नावाखाली दीड कोटी आणि दत्तक मुलीबाबत गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एक कोटी रुपयांची खंडणी उकळली. यासोबतच अनेकांना दिल्लीतील हॉटेलमध्ये नेऊन तरूणीशी शारीरिक संबंध करताना व्हिडिओ आणि फोटो काढल्यानंतर समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन २० कोटींची खंडणी वसूल केली. तसेच काहींना नोकरी लावून देण्याच्या नावावर लाखो रुपये उकळले.

हेही वाचा >>>Video: भरधाव वेगातील स्कॉर्पिओ पुलावरुन वैनगंगेत कोसळली; चालकाचा जागीच मृत्यू, खिडकीची काच फोडून बाहेर काढला मृतदेह

आता पारसेचे काय होणार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजीत पारसेविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची ६ बँक खाती आणि लॉकर्स सिल करण्यात आले आहेत. त्याची चल-अचल संपत्ती सिल करण्यात येणार आहे. त्याच्यासह कटात सहभागी असलेले नातेवाईक, मित्र, ड्रायव्हर आणि साथिदारांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. येत्या काही दिवसांत अजितला अटक होईल. अनेक महिलांशी अश्लील चँटिंग केल्याचे उघडकीस आल्यामुळे तक्रार आल्यास स्वतंत्र गुन्हा दाखल होईल.