पंतप्रधान कार्यालयातून निधी मिळवून देण्याच्या नावाखाली एका नामांकित होमियोपॅथी डॉक्टरची नागपुरातील तोतया ‘सोशल मीडिया’ विश्लेषक अजित पारसे याने साडेचार कोटींची फसवणूक केली. या प्रकरणी अजित पारसेविरुविरुद्ध कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकृती ठिक नसल्याचे कारण पुढे केल्यामुळे पारसेने तृर्तास स्वतःची अटक टाळल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडकस चौकात राहणारे डॉ. राजेश मुरकुटे (४८) यांचे होमियोपॅथी क्लिनिक आहे. २०१९ मध्ये हेमंत जांभेकर यांच्या माध्यमातून डॉ. मुरकुटे यांची पारसेसोबत ओळख झाली. पारसे हा स्वतःला नागपुरातील मोठा सोशल मीडिया विश्लेषक असल्याचे सांगायचा. नागपुरातील एका राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. तसेच तो राज्यातील अनेक मंत्र्यांचे ‘सोशल मीडिया’ सांभाळणाऱ्या टीमच्या संपर्कात असतो. त्यामुळे तो शासकीय यंत्रणा हातात असल्याची थाप नेहमी मारत होता. डॉ. मुरकुटे नवीन होमियोपॅथी महाविद्यालय सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी पारसे याच्याशी चर्चा केली.

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

महाविद्यालय सुरु करण्यासाठी ट्रस्ट स्थापना करण्याचा सल्ला पारसेने दिला. त्या ट्रस्टला पंतप्रधान कार्यालयातून सीएसआर निधी मिळवून देण्याचे आमिष पारसेने दाखवले. त्यानुसार डॉ. मुरकुटे यांनी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. यादरम्यान महाविद्यालयास परवानगी देण्यासाठी पीएमओ कार्यालय तयार असल्याचे पारसेने डॉ. मुरकुटेला सांगितले.’पीएमओती’ल एका तोतया अधिकाऱ्याशी चर्चा झाली’ असे सांगून ‘व्हॉट्सअप’वरील काही ‘स्क्रिनशॉट’ही डॉ. मुरकुटेंना दिले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला आणि पुढील काम करण्यासाठी २१ जुलै २०२० रोजी पारसेने मुरकुटे कडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्याचे नाव सांगून पारसेने जवळपास दोन कोटी रुपये डॉक्टरकडून घेतले.

डॉ. मुरकुटे हे एका आर्थिक प्रकरणात एका व्यवसायिकाचे आर्थिक हमीदार होते. त्याची माहिती मिळताच पारसेने डॉक्टरला सापळ्यात अडकवित ‘सीबीआयने तुमचा वॉरंट काढला असून चौकशी होणार आहे ,असे सांगितले. तो वॉरंट मागे घेण्यासाठी त्याने दीड कोटी रुपयांची खंडणी उकळली. पैसे मिळताच त्याने बनावट रिपोर्टची बनावट प्रत पाठवून सीबीआयच्या नावाचा वापर करून खंडणी उकळली.
डॉक्टरच्या कुटुंबातील एकाने एक मुलगी दत्तक घेतली होती. त्या दत्तक प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. पारसने त्या दाम्पत्याला या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून तपास होणार असून पोलीस अटक करणार असल्याची धमकी देऊन अडीच कोटी रुपये उकळले.

हेही वाचा : भंडारा : गुराख्याला एकाचवेळी चार वाघांचे दर्शन ; परिसरात भीतीचे वातावरण

पारसेला एकूण साडेचार कोटी रुपये दिल्यानंतरही तो वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने डॉ. मुरकुटे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले. तपासाअंती या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पारसेने अनेक डॉक्टर आणि शासकीय अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कामाने दिल्लीत नेले. तेथे अलिशान हॉटेलमध्ये व्यवस्था केली. त्यांच्याकडे देशी-विदेशातील तरूणींना पाठवले. सीसीटीव्ही आणि कॅमेरे लावून त्यांच्या अश्लिल चित्रफिती बनवल्या. त्या चित्रफितीची भीती दाखवून पारसेने २० कोटींची खंडणी उकळल्याची माहिती आहे.

हेही वाचा : १३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणारा ‘टायगर’ अखेर जेरबंद

गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेने अजित पारसेच्या घरी छापा घातला. छाप्यात पोलिसांना मोठ्या मंत्र्यांच्या नावाचे लेटरपॅड, चक्क पोलीस ठाण्याचे शिक्के, शासकीय कार्यालयाचे शिक्के, स्टँपपेपर यासह लॅपटॉप, पेनड्राईव्ह, सीडी, डिव्हिडी आणि अन्य आक्षेपार्ह वस्तू अजीत पारसेच्या घरातून जप्त केल्या. लॅपटॉपमध्ये शहरातील काही तरूणींचे अश्लील छायाचित्र, चित्रफिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud case file against ajit parse social media kotwali police nagpur tmb 01