नागपूर : एकविसाव्या शतकाला तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. या शतकाच्या सुरुवातीच्या दोन दशकातच मानवाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. मात्र तंत्रज्ञान जितक्या वेगाने प्रगती करत आहे, तितक्याच वेगाने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे गुन्हे वाढत आहेत. सायबर गुन्हेगारीचे दररोज नवनवे प्रकार बघायला मिळत आहेत. सायबर गुन्हेगार आतापर्यंत इंजिनिअर, डॉक्टर आणि अनेक लोकांची नावे घेऊन फसवणूक करायचे, मात्र आता सायबर गुन्हेगारांची मजल थेट न्यायालयांपर्यंत पोहोचली आहे.

गुन्ह्यांबाबत न्यायासाठी ज्या न्यायमूर्तींकडे लोक दाद मागतात, आता त्याच न्यायमूर्तींच्या नावावर लोकाची फसवणूक करण्याचा कारभार सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. याबाबत स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस काढत लोकांना सावध राहण्याची सूचना केली आहे. न्यायालयाने काढलेल्या नोटीसनुसार, सायबर गुन्हेगार उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावाने लोकांना पैसे मागत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठात कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांच्या नावानेही बनावट लिंक्स, संदेश पाठविले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये थेट न्यायमूर्ती बनून काही लोक फसवणूक करण्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. अशाप्रकारच्या बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाने नागरिकांना केले आहे.

Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक

हेही वाचा – नागपूर ‘हिट अ‍ॅण्ड रन’मुळे चर्चेत आलेल्या लाहोरी बारवर वरदहस्त कुणाचा?

अशी करा तक्रार

मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्ती तसेच न्यायिक अधिकारी यांच्या नावाने कुणी आर्थिक मागणी करत असेल तर अशा प्रकरणांची तात्काळ स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार करण्याचे आवाहन न्यायालयाने केले आहे. अशाप्रकारच्या बनावट कॉल, संदेशांना उत्तर देणे टाळणे, लिंक्सवर क्लिक न करणे, आर्थिक मागणी झाल्यास तक्रार करणे आदी उपाय न्यायालयाने सुचविले आहेत. न्यायालय याप्रकरणांची तपास यंत्रणांकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्याच्या तयारीतही आहे. न्यायालयाने अशाप्रकारच्या फस‌वणुकीच्या तक्रारीसाठी एका ‌विशेष अधिकाऱ्याची नेमणूकही केली आहे. न्यायमूर्तींच्या नावावर फसवणूक झाल्यास राजेंद्र वीरकर यांना तक्रार करण्याचे आवाहन न्यायालयाने केले आहे. तक्रारीसाठी rajvirkar@yahoo.com या ईमेलवर किंवा ९८२१२८१४४५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन न्यायालयाने नोटीसच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा – बुलढाणा : पोहोताना तिघे मित्र बुडाले! दोघे बचावले, एकाचा मृत्यू

सरन्यायाधीशांनाही सोडले नाही

सायबर गुन्हेगारांनी थेट सरन्यायाधीशांच्या नावाचा वापर केल्याचं प्रकरण अलिकडेच समोर आले आहे. एका स्कॅमरने दिल्लीतील काही लोकांना तोतया सरन्यायाधीश बनवून मेसेज पाठवला होता. यामध्ये म्हटलं होतं, “हॅलो, मी सरन्यायाधीश आहे. कॉलेजियमबरोबर आमची एक महत्त्वाची बैठक आहे. मी कनॉट प्लेसमध्ये अडकलोय. मला कॅबसाठी (टॅक्सी) ५०० रुपये पाठवू शकता का? मी न्यायालयात पोहोचताच तुमचे पैसे परत करेन”. याबाबत सरन्यायाधीशांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सायबर विभागात तक्रार दाखल करून तपास करण्याचे निर्देश दिले होते.