लोकसत्ता टीम

अमरावती: शासकीय नोकरीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड करण्‍यात गाडगेनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींनी शहरातील २८६ बेरोजगारांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

The youth living in the police headquarters are cheated with the lure of jobs
पोलीस मुख्यालयात वास्तव्यास असणाऱ्या तरुणांना नोकरीच्या आमिषाने गंडा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Fraud on name of getting admission to medical education two accused arrested
वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, दोन सराईत आरोपींना अटक
Panvel, administrative building Panvel,
पनवेल : प्रशासकीय भवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा, ‘त्या’ तीन गाळे मालकांचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला
uran farmers land marathi news
‘सेझ’च्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्या, सुनावणी करण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Police patrol J J Hospital, Mumbai,
मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयात पोलीस घालणार गस्त
thane, Saraswati Mandir Trust School, Naupada, teacher suspension, student assault, legal action, Thane Municipal Education Officer, student safety, thane new
सरस्वती शाळेतील शिक्षिकेला निलंबित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासन सजग
girl molested in nandurbar
Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून पाचवीतील मुलीचा विनयभंग; अश्लिल व्हिडीओ दाखवून…

हर्षदा प्रदीप घोम (३७) रा. साईनगर व क्षीतिज राजेश आगरकर (२८) रा. धामणगाव रेल्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरातील अर्जुननगरातील रहिवासी विवेक सुरेंद्र नस्तिाने (२७) यांना या दोन्ही आरोपींनी तलाठी या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांची २ लाख ७० हजारांनी फसवणूक केली होती. या प्रकरणी विवेक नस्तिाने यांनी ४ मार्च रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. या प्रकरणात हर्षदा घोम हिला अटक करण्यात असून पाठोपाठ तिचा सहकारी क्षीतिज आगरकर यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. तपासात या दोन्ही आरोपींनी शहरातील २८६ बेरोजगारांना जिल्‍हा सामान्य रुग्णालय व मारुती सुझुकी कंपनी, बडनेरा येथे नियुक्ती देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची बाब तपासात समोर आली. दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेतल्यावर फसवणूक झालेल्या बेरोजगारांनी नोकरीसाठी दिलेले अर्ज, आधार कार्ड व फोटो आढळून आले आहेत. पोलीस दोन्ही आरोपींचे बँक खाते तपासून त्यांनी आणखी किती बेरोजगारांची फसवणूक केली, याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद साळोखे, मनीष सावरकर, ओम सावरकर, योगेश इंगोले, मंगला परिहार आदींनी केली.