वर्धा : अशी ही बनवाबनवी अनेक ठिकाणी चालू असते. मात्र त्यात जुजबी डिग्रीवर प्रॅक्टिस करणारा डॉक्टरच फसावा, हे जरा धक्कादायक म्हणावे लागेल. बोरगाव मेघे या गावात इलेक्ट्रो होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे विशाल देवराज गाडेगोने यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारीनुसार त्यांच्या दवाखान्यात डॉ. नरेंद्र चंदनखेडे हे भेटण्यास आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील राम पवार यांनी माझी बीएएमएसची डिग्री मिळवून दिली असल्याचे चंदनखेडे यांनी सांगितले. तसेच तुम्ही पण अशी डिग्री करवून घ्या, असा सल्ला दिला. त्यावर ही डिग्री नियमित अभ्यासक्रम पूर्ण केली तरच प्राप्त होत असल्याने हा प्रकार करणे शक्य नसल्याचे उत्तर गाडेगोने यांनी दिले. कॉलेजमध्ये न जाता डिग्री मिळवून देतो असे सांगत चंदनखेडे यांनी १ मार्च २०२१ रोजी गाडेगोने यांना डोंगरगावला बोलावले. दोघेही मिळून तेंबुर्धा येथे डॉ. गुजर यांनी भेटले. तिथे चंदनखेडे यांच्या प्रमाणेच तुमची अ‍ॅडमिशन राम पवार करून देतील अशी हमी देण्यात आली. राम पवार यांनी विविध अ‍ॅडमिशन करून दिल्याचे सांगत नाशिक येथील आरोग्य विद्यापीठात प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. तसेच कॉलेजमध्ये जाण्याची गरज राहणार नाही, असे सांगितले.

हेही वाचा – स्मृती इराणींचे राहुल गांधींना आव्हान, “आमचा एक साधा कार्यकर्ताही…”

हेही वाचा – वाशिम लोकसभेचा उमेदवार कोण? भावना गवळी की संजय राठोड? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

या कामासाठी २६ लाख रुपये खर्च येणार असून जर एकचवेळी पैसे देण्याची तयारी असेल तर फक्त साडेतेरा लाखच द्यावे लागतील. त्याच वेळी पवार यांनी रमेश दांगट नामक व्यक्तीला फोन लावत बोलणे करून दिले. पक्के ठरल्यावर गाडेगोने यांनी पत्नीच्या नागरी बॅंक शाखेतील खात्यातून साडेचार लाख रुपये पवार यांनी सांगितलेल्या खात्यात वळते केले. उर्वरित पूर्वीच रोख दिले होते. तीन महिन्यांनंतर अ‍ॅडमिशनबाबत विचारणा केल्यावर आठवडाभर थांबण्याची विनंती करण्यात आली. तसेच थेट डिग्रीच आणून देतो, असे प्रलोभन दिले. मात्र गाडेगोने यांनी मला अशी डिग्री नको असल्याचे स्पष्ट करीत परीक्षा देऊनच डिग्री घेणार अन्यथा पैसे परत करा, असे सांगितले. तेव्हा बीएएमएसची डिग्री तयार करून दिली असून आता पैसे परत करणार नसल्याचे धमकावले. तेव्हा फसवणूक झाल्याचे गाडेगोने यांच्या लक्षात आले. त्यांनी आपली अश्या प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. त्यावर विविध कलमांखाली राम पवार व रमेश दांगट यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in the name of conferring doctor degree incident in wardha district pmd 64 ssb