लोकसत्ता टीम

भंडारा: कमी किमतीत वाहने खरेदी करण्याचे प्रलोभन देत भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार वाहन चालकांची ३० कोटींनी फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

‘एम फायनान्सच्’या एका संचालकला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संबंधित शोरूम चालक व फायनान्स कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार फसवणूक झालेल्या संतप्त ग्राहकांनी केली आहे.

आणखी वाचा- आमदार, खासदार, सरकारी नोकरांचे पेन्शन कमी करून शेतकऱ्यांना मासिक मानधन द्या

फसवणुकीबाबत माहिती देताना राहुल मारबते यांनी सांगितले की, दुचाकी वाहन खरेदी करायला गेले असता एम फायनान्स कंपनी मधून वाहन घेतल्यास कमी किंमतीत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. ६ महिन्यांचा हप्ता खरेदी करण्यासाठी भंडारा येथील शोरूममध्ये दोन हजार रुपये भरण्यास सांगितले. ९६, हजाराची दुचाकी ७४,००० हजार रुपयांना मिळाल्याने ग्राहकही आनंदी झाले. मात्र, प्रत्यक्षात एम फायनान्स कंपनीने स्वतःच्या कंपनीतून फायनान्स न करता टाटा, श्रीराम सिटी, बेरार बाईक्स इत्यादी कंपनीमधून फायनान्स केला होता. आता या कंपनी पैशासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

भंडारा येथील आशिष गोस्वामी, अरुण अतकरी, ईश्वर

बोधनकर आणि इतर अनेकांच्या बाबतीत असेच घडले. साधारणपणे हा प्रकार भंडारा तसेच गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार लोकांसोबत घडला आहे.

आणखी वाचा- सावधान! ‘एच ३ एन २’चा धोका वाढला, वाशीम येथील सात वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूनंतर अहवाल ‘पॉझिटिव्ह’

याप्रकरणी भंडारा पोलिसांनी एम फायनान्सचे संचालक कासीब खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी शोरूममध्ये बसून अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या शोरूम मालक, कर्मचारी आणि फायनान्सर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शोरूमला नोटीस

कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार भंडारा पोलिसांत दाखल होताच शोरूमला नोटीस बजावण्यात आली. भंडारा पोलिसांनी संबंधित फायनान्स कंपनी आणि शोरूम मालकांना नोटिसा पाठवून पोलीस ठाण्यात बोलावले.

Story img Loader