भंडारा : पैसे दुप्पट करून देण्याचा नावावर जवळपास ३९ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार तुमसर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी कुंजनलाल भोंडेकर (३०), मृणाली शहारे (२५) व ओमप्रकाश रमेश गायधने (३३ ) यांच्याविरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>> भंडारा : मोबाईल खरेदीसाठी पैसे उसने घेतले, अन्…; सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
दुर्गेश सुरेश कनोजे (३५, रा. रविदास नगर, तुमसर) यांनी ट्रेडविन मल्टीसर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, वर्थ मोटिव ट्रेड इन्फिनिटी मल्टी सर्विसेज कंपनीमध्ये ३८ लाख ७७ हजार ६० रुपयांची गुंतवणूक केली होती. कालावधी संपल्यानंतर दुर्गेश कनोजे यांनी पैसे परत मागितले असता तिन्ही आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कनोजे यांनी तुमसर पोलीस स्टेशन गाठून आरोपी कुंजनलाल भोंडेकर, मृणाली शहारे व ओमप्रकाश रमेश गायधने यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे.