वर्धा : मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे नवनवे तंत्र भामटे विकसित करीत आहेत. सावंगी येथे राहणाऱ्या २८ वर्षीय प्राध्यापक महिलेची झालेली फसवणूक सावध राहण्याचा इशारा देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या महिलेस तुमच्या पार्सलमध्ये पाच पासपोर्ट, कापड, सहा क्रेडिट कार्ड तसेच १४० ग्रॅम एम. डी. हे मादक द्रव्य सापडल्याचे कथित फेडेक्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून फोन केला. त्यातून वाचायचे असेल तर पैसे पाठविण्याचा इशारा दिला. मुंबई पोलीस सायबर क्राईम नावाने स्काईप करीत हा फोन करण्यात आला. महिलेने भितीपोटी अडीच लाख रुपये ऑनलाइन पाठविले. मात्र त्याची तक्रार शहर पोलिसांकडे करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत तांत्रिक पद्धतीने तपास सुरू झाला. त्यात नांदेड येथील अंबादास कांबळे व औरंगाबादचा अनिल संभाजी पाटील अडकले.

हेही वाचा – भाजपा नेत्या सना खान हत्याकांड : अमित साहूच्या नार्को चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

हेही वाचा – रामदास आठवले म्हणतात, वंचितमधील कार्यकर्त्यांसह रिपब्लिकनच्या गटांना सोबत घेणार

अधिक तपासात गुजरात कनेक्शन दिसून आले. त्यात सूरत येथील अजय पाटील व पृथ्वीश मावाणी हे आरोपी सापडले. त्यांच्याकडून पाच मोबाईल व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आणखी आरोपी असण्याची शक्यता व्यक्त होते. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी मार्गदर्शन केले. सायबरचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे तसेच अंमलदार वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रणजीत जाधव, अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, लेखा राठोड, प्रतीक वंदिले, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टाकसाळे, मीना कोरोती, विशाल मडावी, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अंकित जिभे, स्मिता महाजन यांच्या चमूने ही कारवाई फत्ते केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud with 28 year old female professor living in sawangi in wardha pmd 64 ssb
Show comments