अमरावती : ऑनलाइन केलेली ऑर्डर रद्द झाल्यानंतर रक्‍कम परत मिळवून देण्याच्या नावावर एका महिलेला ९४ हजार २३७ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संबंधित मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रहिवासी एका महिलेने फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका कंपनीच्या ॲपवर ऑनलाइन फरसान ऑर्डर केले. त्यासाठी त्यांनी ४१६ रुपयेसुद्धा पाठविले. परंतु, त्यांची ऑर्डर रद्द झाली. त्यामुळे महिलेने पाठविलेली रक्‍कम परत मिळविण्याकरिता संबंधित कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक गुगलवर शोधला. एक क्रमांक दिसून आल्यावर त्यांनी त्यावर संपर्क साधला. ऑर्डरसाठी पाठविलेले पैसे परत करण्याची विनंती त्यांनी संबंधित मोबाइल क्रमांकधारकाकडे केली. त्यावर समोरील सायबर लुटारूने त्यांना पैसे परत मिळविण्‍याच्‍या प्रक्रियेकरिता रस्टडस्क हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावयास सांगितले. त्यानुसार महिलेने आपल्या मोबाइलमध्ये हे ॲप इन्स्टॉल केले. त्यानंतर आरोपीने त्यांना त्या ॲपमधील कोड विचारला. महिलेने कोड त्या ॲपवर टाकला. त्यानंतर त्यांनी आरोपीने सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली. त्याचवेळी त्यांच्या खात्यातून ९४ हजार २३७ रुपये वळते करण्यात आले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – वातावरण बदलाचे जमिनीवर परिणाम; नागपूरच्या राष्ट्रीय संस्थेकडून राज्यातील पाच हजार गावांत संशोधन

हेही वाचा – मांज्यामुळे जायबंदी झालेला ‘ब्लॅक ईगल’ नैसर्गिक अधिवासात मुक्त; पायाला रिंग लावून घेतली भरारी..

महिलेने आपले फोन-पे चेक केल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत बँकेला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader