दापोली:  शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला खेड पोलिसांकडून ठाणे येथून अटक करण्यात आली.  शशिकांत मिरजकर (रा. भाईदर ईस्ट ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार यांना संशयिताने फोन करून तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडे गुंतवणूक करा. तुम्हाला जास्तीतजास्त रक्कमेचा परतावा देण्यात येईल असे आमिष दाखविले होते. या अमिषाला बळी पडून तक्रारदार यांनी २०१९ ते २०२३ या कालावधीत १४ लाख २८ हजार गुंतवणूक केली होती. दरम्यान आपली मोठी  फसवणूक झाल्याचे लक्षात दाखवून येताच तक्रारदार यांनी ऑनलाईन रुपयांची फसवणूक केली,  म्हणून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यातील संशयिताचा तांत्रिक गोष्टीवरून व बँकेच्या माहितीच्या आधारे शोध घेत असताना हा संशयीत  नवघर, मिरा भाईंदर जि. ठाणे येथे असल्याचे तपासात निष्पन्न झालेले होते.  ही कामगिरी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, हवालदार दीपक गोरे, रुपेश जोगी, वैभव ओहोळ, राम नागुलवार, टेक्नीकल अनालेसिस ब्रँच मधील हवालदार रमिज शेख यांनी केली आहे.