नागपूर : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने आणि त्याच्या साथीदारांनी काही सुशिक्षित बेरोजगारांची ३२ लाखांनी फसवणूक केली. सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
सचिन गायकवाड (३०), किरण गायकवाड (२७), दोन्ही रा. अजनी नगर, अमरावती आणि त्यांचा साथीदार अरूण ठाकरे (४५), रा. वाशिम अशी आरोपींची नावे आहेत. सचिन आणि किरण पती-पत्नी असून नेरपिंगळई येथे त्यांची शेती आहे. वेलकम सोसायटी, काटोल रोड निवासी फिर्यादी शंकर धुराटे (६३) यांचा मुलगा सुशिक्षित असून नोकरीच्या शोधात आहे. मुलगा नोकरीवर लागावा अशी वडिलांचीही इच्छा होती. त्यामुळे वडिलही त्याच्या नोकरीसाठी प्रयत्नशील होते.
हेही वाचा >>> सरसंघचालक-अमित शाह यांच्यात भेट नाहीच, भागवत रायबरेली दौऱ्यावर
दरम्यान, शंकर यांची नातेवाईकांच्या माध्यमातून आरोपींशी ओळख झाली. सचिन आणि किरणने शंकर यांना नोकरीचे आमिष दाखवले. शासकीय कार्यालयात आपली चांगली ओळख आहे. अधिकारी आणि संचालकांशी आपली जवळीक असल्याचे सांगून त्यांना जाळ्यात ओढले. शंकर हे जाळ्यात अडकताच त्यांच्याकडून वेळोवेळी ३२ लाख रुपये घेतले. त्याच प्रमाणे जितेंद्र भांडारकर (२८), रा. गोंदिया या युवकाला सुध्दा नोकरीचे आमिष देवून लाखो रुपये उकळले. तसेच बेलतरोडी निवासी दीपक मुपीडवार (५०) यांचा मुलगा देखील सुशिक्षित असून तोही नोकरीसाठी प्रयत्नशील होता. आरोपींनी मुपीडवार यांनाही आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या मुलाची देखील फसवणूक केली. तीन चार वर्षानंतर नोकरीचा काही ठावठिकाणा दिसत नसल्याचे शंकर यांनी पैसे परत मागितले. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. अखेर शंकर यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.
हेही वाचा >>> धान घोटाळ्यात केवळ कागदोपत्री कारवाई; भंडारा पणन अधिकारी निलंबित
उमेदवारांची बोगस यादी शासकीय आणि निमशाकीय कार्यालयात चांगली ओळख असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण आणि कृषी विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. तसेच महाराष्ट्र इंन्फॉरमेशन टेक्नोलॉजी कार्पोरेशनमधील उमेदवारांच्या नावाची यादी तयार करून त्यात पीडित युवकांच्या नावाचा समावेश केला.