वर्धा: दानत्वाचे मोठे उदाहरण म्हणून विदर्भात माजी खासदार दत्ता मेघे यांचा परिचय दिला जातो. त्यांनी आता वर्षाकाठी २५ लाख रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या संस्थेच्या विदर्भात स्कूल ऑफ स्कॉलर या नावाने १८ शाळा गत तीस वर्षांपासून चालवल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या शाळेसाठी खास बोधचिन्ह तयार करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की आर्थिकदृष्ट्या मागास होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोफत प्रवेश देणार. त्यासाठी संस्थेस भार न देता दरवर्षी २५ लाख रुपयाची तरतूद करणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा… गोंदिया: नवेगावबांध जवाहर नवोदय विद्यालयात हे चाललंय तरी काय? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संस्थेच्या १८ शाळेत २२ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिकत असून एक हजार शिक्षक कार्यरत आहेत. नवे बोधचिन्ह हे वैज्ञानिक दृष्टीचे प्रतीक असून परंपरा, विज्ञान व तंत्रज्ञान यांचा मिलाफ संस्थेच्या शिक्षणात असल्याची भूमिका मुख्य सल्लागार देविका मेघे यांनी मांडली. आभा मेघे यांनी शाळा उपक्रमाची माहिती दिली. जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, प्राचार्य मनिकांदन तसेच राहुल दाते, राहुल बोबडे, नमिता कोळसे यांची सावंगी येथे प्रमुख उपस्थिती होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free admission to higher education for economically backward students said by former mp datta meghe pmd 64 dvr
Show comments