नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात लवकरच यकृत व हृदय प्रत्यारोपण सुरू होणार आहे. त्यासाठी मंजुरीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांवर नि:शुल्क प्रत्यारोपण होईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली.

मेडिकलच्या एपीआय सभागृहात बुधवारी झालेल्या पत्रपरिषदेत डॉ. गजभिये बोलत होते. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, युरोलाॅजी विभागाचे प्रा. धनंजय सेलुकर, नेफ्रालाॅजी विभागाच्या डॉ. वंदना आदमने, प्रशासकीय अधिकारी अविनाश शेकापुरे, आशीष भोयर उपस्थित होते. डॉ. गजभिये पुढे म्हणाले, मेडिकलच्या हृदय व यकृत प्रत्यारोपण केंद्राला काही परवानग्या मिळाल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील परवानगी लवकरच मिळेल. सुमारे दीड महिन्यात प्रत्यारोपण सुरू होण्याची शक्यता आहे.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण

हेही वाचा : सावधान! प्रोटीन पावडरचा अतिरेक जीवघेणा ठरण्याची शक्यता; विधि शाखेच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

प्रत्यारोपणासाठी आवश्यक यंत्र, पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. सुपरमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या ७४ शस्त्रक्रिया झाल्या असून त्याच्या यशस्वीतेचा दरही उत्तम आहे. ही आकडेवारी भविष्यात आणखी वाढेल. सुपरमध्ये यकृत आणि हृदयाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यास भविष्यात हे शासकीय रुग्णालय अवयव प्रत्यारोपणाचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास डॉ. गजभिये यांनी व्यक्त केला. डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, मेडिकलमध्ये मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून जास्तीत जास्त अवयवदान करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. समाजाने पुढाकार घेतल्यास अवयवातून अनेकांचे प्राण वाचू शकतील.

दोन लाख मूत्रपिंडांची गरज, मिळतात केवळ २० हजार

देशात वर्षाला २ लाख रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात केवळ २० हजार रुग्णांवरच प्रत्यारोपण होते. त्याला अवयवदानाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. देशात वर्षाला ५० हजार रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते. परंतु, केवळ १ हजार ७५० रुग्णांवरच प्रत्यारोपण केले जाते. २ हजार रुग्णांमध्ये हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना केवळ ३५० प्रत्यारोपण होतात, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

हेही वाचा : सावधान ! राज्यात चिकनगुनियाची रुग्णसंख्या तिप्पट; डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ

अवयव दान जनजागृती रॅली ३ ऑगस्टला

मेडिकल रुग्णालय, सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणि मोहन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑगस्टला मेडिकलमधून अवयवदान जनजागृती रॅली सकाळी १०.३० वाजता निघणार आहे. त्यात विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचाही सहभाग असेल. अवयवदान पंधरवड्यानिमित्तही मेडिकलमध्ये विविध कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा : वर्धा : जे आजपर्यंत घडले नाही, ते आता घडणार; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रथमच…

जिल्ह्यात ७०० रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत

नागपूर जिल्ह्यात गरजू रुग्णांच्या तुलनेत अद्यापही मेंदूमृत रुग्णांच्या अवयवांचे दान होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ७०० रुग्ण हे विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २३ नोंदणीकृत अवयव प्रत्यारोपण रुग्णालयांचा बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला असता ही आकडेवारी पुढे आली. अवयवांच्या प्रतीक्षेतील रुग्णांना जीवदान मिळावे म्हणून जास्तीत जास्त मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान व्हावे. त्यातूनच प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी कमी होईल. त्यासाठी सर्वच रुग्णालय प्रशासन, तेथील डॉक्टरांसह नागरिकांनीही अवयवदानासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे यावेळी डॉ. ईटनकर म्हणाले. बैठकीला विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्यासह जिल्ह्यातील २३ नोंदणीकृत अवयव प्रत्यारोपण रुग्णालयाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी, समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक रुग्णालयात मस्तिष्क स्तंभ मृत्यू समिती गठित करण्याची सूचनाही करण्यात आली. या समितीने मेंदूमृत रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेवण्यासह या रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाला प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही आवाहन त्यांनी केले.