चंद्रपूर : रिमझिम पावसाचा मनसोक्त आनंद घेत पट्टेदार वाघ मुक्ताई धबधबा परिसरात मुक्त फिरत आहे. मुक्ताईला भेट देणाऱ्या पर्यटकांनी वाघाच्या मुक्त संचाराचा हा व्हिडिओ चित्रबद्ध केला आहे.
पावसाळी पर्यटनाात चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूरचे काही पर्यटक मुक्ताई येथे पर्यटनासाठी गेले असता तिथे त्यांना पट्टेदार वाघाने मनसोक्त दर्शन दिले. पावसाळ्याचा आनंद घेत हा शेर ए बब्बर वाघ रिमझिम पावसात रुबाबदारपणे मुक्त संचार करीत आहे.
या परिसरात वाघ सातत्याने फिरत असल्याची माहिती पर्यटकांनी दिली. किमान तीन ते चार वाघ या भागात असल्याची माहिती आहे. या वाघाचा व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक फिरत आहे.