लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: जन्मताच बालकांमध्ये दोष, शारिरीक कमतरता, रोग, विकासातील विलंब आणि अपंगत्व, हदयरोग असलेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम वरदान ठरत आहे.

या कार्यक्रमातंर्गत २००८ पासून मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण १ हजार २९ बालकांची हृदय शस्त्रक्रिया व ५ हजार ३६ बालकांची विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. तर २०२२-२३ मध्ये एकूण १२६ बालकांची हृदय शस्त्रक्रिया व ३०२ बालकांची विविध शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत असल्याने हजारो गोरगरीब कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा… सावधान! रसवंतीतला बर्फ धोकादायक

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात अंगणवाडी व शाळा (शासकीय व निमशासकीय शाळा) तपासणी करिता एकूण २४ पथक कार्यरत आहेत. या कार्यक्रमाअंर्तगत जन्मजात दोष, कमतरता, रोग, विकासातील विलंब आणि अपंगत्व या आजाराच्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान हृदयरोग व इतर आजाराच्या बालकांची शस्त्रक्रियेकरिता निवड करण्यात येते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शाळा व अंगणवाडी मध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरिब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे.

हेही वाचा… नागपूर : मालमत्ता कर ३० जूनपूर्वी भरल्यास १५ टक्के सूट

कार्यक्रमाअंतर्गत सन २००८ पासून मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण १०२९ बालकांची हृदय शस्त्रक्रिया व ५०३६ बालकांची इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून घेण्यात आली आहे. २०२२-२३ मध्ये एकूण १२६ बालकांची हृदय शस्त्रक्रिया व ३०२ बालकांची इतर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच १८ एप्रिल रोजी १२ बालकांना हृदय शस्त्रक्रिया व ३ बालकांना इतर शस्त्रक्रियेकरिता आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी येथे भरती करण्यात आले आहे. कार्यक्रमाअंर्तगत बालकांमध्ये आढळणाऱ्या विविध आजाराचे निदान केले जात असले तरी हृदयरोग आजारासह विविध आजाराकरिता संदर्भात बालकांच्या उपचारावर विशेष भर देण्यात येते. या बालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांच्यावर महागडे उपचार करणे त्यांच्या कुटुंबियांना शक्य होत नाही. अशा परिस्थीतीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या कुटुंबियासाठी संजिवनी ठरत आहे.

हेही वाचा… Video: कामगाराच्या अंगावर वीज कोसळतानाची थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या या प्रयत्नामुळे सदर कुटुंबियामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी बालकांमध्ये हृदय विकार उशिरा लक्षात येत असल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागत असे, परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अशा रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. या कार्यक्रमामुळे बऱ्याच बालकांना मोफत उपचार उपलब्ध होत असून हजारो कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, तसेच पथकाच्या प्रयत्नांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free surgery on 6 thousand children with congenital heart disease and various diseases in chandrapur rsj 74 dvr
Show comments