वर्धा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी मोफत अनिवासी प्रशिक्षण मिळणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी तर्फे हे प्रशिक्षण राज्यातील केवळ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.त्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात आले असून प्रशिक्षणाच्या निवडीसाठी २७ ऑगस्टला सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यातील अनुसूचित जातीच्या तीनशे विद्यार्थ्यांची निवड दिल्ही येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या प्रशिक्षणासाठी केल्या जाईल.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र असावा.प्रशिक्षण शुल्क बार्टी तर्फे दिल्या जाईल.तसेच उमेदवारांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रती महिना कमाल १३ हजार रुपये मिळणार आहे.

हेही वाचा >>>वर्धा : ‘कार्यालयास दलालांनी घेरले, पैसे घेतल्याशिवाय काम होतच नाही हो ‘ लाभार्थ्यांचा टाहो…

दिल्ली येथे जाण्यासाठी पाच हजार तसेच परतीच्या प्रवासासाठी पाच हजार रुपये मिळणार आहे.प्रशिक्षणात तीस टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.अर्ज भरण्यासाठी डब्लूडब्लुडब्लू . एसआयएसी. आर्ग.इन या संकेस्थळास भेट देण्याचे सूचित करण्यात आले आहे.