नागपूर : व्हीएनआयटीच्या आतून अखेर वाहतूक सुरू झाली. आयटीपार्क चौकाकडील व्हीएनआयटीच्या नव्या प्रवेशद्वारातून थेट यशवंतनगर चौकातील प्रवेशद्वारापर्यंत वाहने सोडण्यात येत होती. परंतु, एकेरी वाहतुकीचीच परवानगी असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

अंबाझरीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्हीएनआयटीतून वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, व्हीएनआयटीच्या संचालकांनी सकाळी आणि सायंकाळी दोन तासच वाहतुकीस परवानगी दिली. तसेच आतील परिसरातून एकेरी वाहतुकीचाच आग्रह धरला. आयटीपार्क चौकाकडच्या नव्या प्रवेशद्वारातून वाहनचालकांना प्रवेश देण्यात आला. परंतु, यामुळे अंबाझरीतील वाहतूक कोंडीवर सक्षम पर्याय सापडलेला नाही. माटे चौक ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी कायमच आहे. यशवंतनगर चौकातील व्हीएनआयटीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी अनेक वाहनचालकांनी गर्दी केली होती. ते वाहतूक पोलीस आणि सुरक्षारक्षकांशी वाद घालून आतमध्ये सोडण्याची मागणी करीत होते. परंतु, अनेक वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी परत पाठवले.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद

हेही वाचा >>>आता सरळसेवा भरती ‘एमपीएससी’मार्फत होणार, शासन निर्णयात काय आहेत तरतुदी बघा

वेळ वाढवण्याची मागणी कायमच

सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास अशी वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, या रस्त्यावरील वाहनांची संख्या बघता दोन तास अपुरे आहेत. सायंकाळी ५ ते ९ यावेळेत वाहतुकीची कोंडी होते. मात्र, सायंकाळी ५ ते ७ अशीच वाहतुकीची वेळ ठरवण्यात आली आहे. त्यामुळे वेळ वाढवण्याची मागणी कायम आहे.

आमदारालाही फटका

यशवंतनगर प्रवेशद्वारातून एक आमदार कारने आले. त्यांनी आमदार असल्याची ओळख दाखवल्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडले. मात्र, बाहेर पडणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ एक पोलीस कर्मचारी तैनात होता. त्याने आमदाराला थांबवले आणि एकेरी मार्ग असल्याचे सांगून परत जाण्यास सांगितले. आमदार असल्याचे सांगितल्यानंतरही पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना नियम पाळण्यास सांगितले. त्यामुळे आमदार महोदयांनी नाईलाजाने परतीचा मार्ग पकडला.