भंडारा : एकीकडे बलात्कारांच्या घटनांनी देश होरपळत असताना भंडारा जिल्ह्यातील एका घटनेने देखील खळबळ उडाली आहे. भंडारा शहरातील एका फळ विक्रेत्याने एका अल्पवयीन मुलाला त्याच्या गोडाऊनमध्ये नेवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. हे कृत्य करतानाचा व्हिडिओ सुध्दा काढला गेला. मात्र १३ दिवस लोटूनही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अखेर काल रात्री या प्रकरणात आरोपी फळ विक्रेत्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात कलम ६४ (१) भारतीय न्याय संहिता सहकलम ४ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लियाकत अली अल्ताफ अहमद अली (वय ४८वर्ष, रा. माकडे मोहल्ला, संजय गांधी वार्ड, भंडारा ) असे आरोपीचे नाव असून हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने सध्या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा…रतन टाटांनी संघ मुख्यालयाला दिली होती भेट, टाटांच्या निधनावर सरसंघचालकांना दु:ख, म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल कल्याण समिती, भंडारा यांचेकडून २८ सप्टेंबर रोजी सदर प्रकरणातील व्हिडीओ आणि संलग्न पत्र पोलीस ठाणे भंडारा यांना देण्यात आले. प्राप्त पत्रान्वये व पेनड्राइव्ह मधील व्हिडीओ नुसार आरोपीने एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून बाल लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा निष्पन्न होत असल्याने व हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे असल्याने पोलीस उप निरीक्षक प्रवीण रमेश नितनवरे यांच्या तक्रारीवरून आरोपी लियाकत अली अल्ताफ अहमद अली याच्याविरोधात पोक्सो अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी लियाकत अली खान याचे बस स्थानकाजवळ फळांचे दुकान असून जवळच गोडवून आहे. १५ सप्टेंबर रोजी मदरसामधून परत येत असताना एका अल्पवयीन मुलाला केळीच्या गोडाऊनमध्ये नेले. तेथे मुलाला आधी केळि खायला दिली आणि त्यानंतर त्यांच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केले. हे करीत असताना तेथेच असलेल्या एका मुलाने या घृणास्पद प्रकारचे चित्रीकरण केले. ते त्याने पीडित मुलांच्या कुटुंबीयांना दाखविले. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला पकडून त्याला मुस्लीम लायब्ररी चौकात आणले आणि बेदम मारहाण केली होती. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. १८ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. मात्र या प्रकरणात कोणीही तक्रार केली नाही. याउलट प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे बोलले जात होते.

हे ही वाचा…नागपूर : अंबाझरी पूल सुरू होणार, काउंट डाऊन सुरु

पीडिताच्या कुटुंबीयांनी केली मारहाण…

आरोपीने अल्पवयीन मुलासोबत गोडाऊनमध्ये दुष्कृत्य करतानाचा व्हिडिओ एका मुलाने लपुनछपून काढला आणि पीडित मुलांच्या कुटुंबीयांना दाखविला. संतप्त कुटुंबीयांनी या नराधमास भर चौकात लाठ्या काठ्यानी बेदम मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण केल्याप्रकरणी पोलीस हवालदार आशिष लक्ष्मणराव तुमाने यांच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे चौघे काही दिवस फरार होते. विशेष म्हणजे जखमी आरोपी फळविक्रेच्या कुटुंबियांकडून देखील पोलीस तक्रार केली नाही.

पीडिताच्या कुटुंबियांकडून तक्रार नाही…

या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून पीडित मुलांच्या कुटुंबियांकडून पोलीस तक्रार करण्यात आली नाही. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येते.

हे ही वाचा…लोकजागर: वादाची ‘कविता’!

काय होते प्रसारित व्हिडीओत ??

प्रसारित व्हिडिओमध्ये एका दुचाकीवर एक रक्तबंबाळ व्यक्ती बसली आहे आणि दुसरी व्यक्ती त्या जखमी व्यक्तीस म्हणते की, तू ज्या मुलांसोबत हे दुष्कृत्य केले आहे ती मुले अवघ्या ७ ते ८ वर्षांची आहे. तुला लहान मुले आहेत म्हणून आज तुला जिवंत सोडत आहोत. यापुढे असे कृत्य करशील तर याद राख.. या व्हिडिओ वरून दोन अल्पवयीन मुलामुलींसोबत त्या नराधमाने दुष्कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fruit vendor in bhandara assaulted minor boy in his godown few days ago ksn 82 sud 02