बुलढाणा : सततच्या अपघातामुळे मृत्यूमार्ग ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आता इंधन चोरट्यांची दहशत वाढली आहे. महामार्गावर रात्री बेरात्री इतर वाहनांतील डिझेल चोरणाऱ्या सुसज्ज टोळ्यांचा मुक्त संचार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी मार्गावर अलीकडे तीन कारवाया करण्यात आल्या. काल संध्याकाळी उशिरा संभाजीनगरमधील एका चोरट्यास पकडण्यात आले. अनिल संजय पवार ( २३, रा. निरगुडी खुर्द तांडा, ता. खुलताबाद जिल्हा संभाजीनगर) असे चोरट्याचे नाव आहे. दुसरबीड ( ता सिंदखेड राजा) नजीकच्या चॅनेल ३१९ वर असलेल्या त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर ( एमएच ०४ एफ आर ०५२१) वाहनातून डिझेलच्या ६ कॅन जप्त करण्यात आल्या. मात्र, त्याचे सहकारी इर्टिका वाहनासह फरार होण्यात यशस्वी झाले.
हेही वाचा – देशातील नद्यांना आजार एक.. सरकार ब्युटी पार्लरमध्ये, राजेंद्र सिंह काय म्हणाले?
रात्री गस्त घालणारे महामार्ग पोलिसांचे वाहन पाहून ते पसार झाले. पकडण्यात आलेल्या अनिल पवार याने ते त्याचे सहकारी असल्याचे सांगितले. गोपाल डहाळके, उमेश नागरे, सचिन सनासे, जयकुमार राठोड यांनी ही कारवाई केली.