नागपूर: मोहगाव झिल्पी तलावावर पार्टी करायला गेलेल्या सहा तरुणांपैकी पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला. तर मित्रांना वाचविण्याच्या प्रयत्नात डॉ. प्राजक्तम लेंडे यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाचही मृत तरुणांवर सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषिकेश अनिल पराळे (२१, गिड्डोबानगर, वाठोडा), शांतनू अरमरकर (वाठोडा), वैभव भागेश्वर वैद्य (भांडेवाडी रोड, पारडी), राहुल अरुण मेश्राम आणि नितीन कुंभारे (दोन्ही रा. गिड्डोबानगर, वाठोडा) अशी बुडून मृत पावलेल्या तरुणांची नावे आहे.

हेही वाचा… गुन्हेगारांच्या टोळ्या संपवून शहर अंमली पदार्थमुक्त करणार! गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांचा संकल्प

रविवारी दुपारी पाच मित्र आणि डॉ. प्राजक्तम मोरेश्व लेंडे (३२, तिरंगाचौक, ओमनगर) हे मोहगाव झिल्पी तलावावर पार्टी करायला गेले होते. ऋषिकेश, शांतनू, राहुल आणि नितीन यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. चौघांनी लगेच तलावात उड्या मारल्या. पोहता येत नसल्यामुळे चौघेही बुडायला लागले. वैभव वैद्य याने मित्रांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्यातील युवकांनी त्याला आतमध्ये खेचले. त्यामुळे पाचही जण गटांगळ्या खाऊ लागले. मित्रांना बुडताना बघून डॉ. प्राजक्तम यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांनाही पोहणे येत नव्हते.

हेही वाचा… अमरावती : संजय खोडके राष्‍ट्रवादीच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षपदावरून बडतर्फ, शपथविधीसाठी उपस्थित राहणे भोवले

खोल पाण्यातून ते कसेबसे बाहेर निघाले. तर उर्वरित पाचही मित्र डॉ. प्राजक्तम यांच्या डोळ्यासमोर बुडत होते. डॉ. प्राजक्तम यांनी आरडाओरड करीत मदतीसाठी धावा केल्या. मात्र, नागरिक तलावापर्यंत पोहचेपर्यंत पाचही तरुणांचा बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या मदतीने पाचही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर पारडी, हुडकेश्वर आणि वाठोडा येथील वेगवेगळ्या दहनघाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वडिलांच्या पुण्याईमुळे भाऊ वाचला

वडिल डॉ. मोरेश्वर लेंडे यांनी आयुष्यभर गोरगरिबांवर उपचार करून सेवा केली. धार्मिक वृत्तीची आई डॉ. वनश्री यांनी वडिलांना पूर्णपणे साथ दिली. रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या वडिलांच्या पुण्याईमुळे माझा भाऊ डॉ. प्राजक्तम हा वाचला. माझ्या भावाचा पुनर्जन्म आम्ही समजतो. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती. अन्य तरुणांचा जीव गेल्याचे अतिव दु:ख आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. प्राजक्तम यांचे मोठे भाऊ मार्मिक लेंडे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral of 5 youths who drowned in lake dr prajaktam is undergoing treatment at the hospital in nagpur adk 83 dvr
Show comments