लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूरयेथील शासकीय महाविद्यालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपाचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला.

यामुळे कुपोषित अवस्थेत पडलेल्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसे तर्फे आरोग्य व्यवस्थेची अंत्ययात्रा काढत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

आणखी वाचा-भुजबळांना सल्ला देण्याची गरज नाही, राधाकृष्ण विखे पाटील असे का म्हणाले…?

अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांना कडक शासन करावे, औषधांचा पुरवठा रुग्णांची वाढती संख्या पाहून करावा, दोन वर्षापासून होत असलेली औषध पुरवठ्याची मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची, कामगारांची शेकडो रिक्त पदे त्वरित भरावी, ऑपरेटिंग एक्स-रे मशीन सुरू करावी, रखडलेल्या यंत्रांची खरेदी अती तातडीने करण्यात यावी, या मागण्या मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केल्या. उपअधीक्षक यांचे कार्यालय गाठत अर्धा तास ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली. आंदोलनात कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह,व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, विधीसेना जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral procession of the health system by mns rsj 74 mrj
Show comments