गडचिरोली : १७ जुलै रोजी गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील जारावंडी पोलीस हद्दीतील वांडोली गावानजिक उडालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात ७ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. सर्वांवर छत्तीसगड आणि महाराष्ट्र शासनाचे २ कोटींहून अधिक बक्षीस होते. मृत्तांमध्ये कसनसूर-चातगाव आणि टिपागड-कोरची दलमच्या ५ वरिष्ठ नेत्यांचादेखील समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जुलै रोजी जरावंडी पोलीस हद्दीतील वांडोली जंगल परिसरात १२ ते १५ नक्षलवादी नक्षल सप्ताहनिमित्त मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते. यासंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सी ६० या विशेष नक्षलविरोधी पथकाचे २०० जवान मुसळधार पावसात वांडोली जंगल परिसरात मोहीमेवर असताना दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जावानांनी केलेल्या कारवाईत १२ नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटीलसह शंकर पोटावी आणि विवेक शिंगोळे हे तिघे जखमी झाले. रात्री उशिरा सर्व मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात आली.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
bjp leader and mlc yogesh tilekar uncle satish wagh killed after kidnapped in pune
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

हेही वाचा – पश्चिम वऱ्हाडाला शिवसेना शिंदे गटाकडून बळ, केंद्रीय राज्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्व

यात चातगाव- कसनसूर संयुक्त दलम प्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय (३६, रा. भिमनखोजी ता. कोरची), कोरची-टिपागड संयुक्त दलमप्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य विशाल कुल्ले आत्राम ऊर्फ लक्ष्मण ऊर्फ सरदु (४३, रा. गोरगुट्टा ता. एटापल्ली), टिपागड दलम विभागीय समिती सदस्य प्रमोद लालसाय कचलामी ऊर्फ दलपट (३१ रा. वडगाव ता. कोरची), या तीन मोठ्या नक्षल नेत्यांसह महारु धोबी गावडे (३१, रा.नैनेर ता.अहेरी), अनिल देवसाय दर्रो ऊर्फ देवा ऊर्फ देवारी (२८, रा. मुरकुटी ता. कोरची), सरिता जारा परसा ऊर्फ मिना ऊर्फ रामे (३७,रा. गळदापल्ली, ता. एटापल्ली), रज्जो मंगलसिंग गावडे ऊर्फ समिता ऊर्फ सिरोंती ( ३५,रा. बोटेझरी ता. कोरची), सिता हवके (२७, रा. मोरडपार ता.भामरागड ), रोजा (रा. बस्तर एरीया छत्तीसगड), सागर (रा. बस्तर एरीया छत्तीसगड), चंदा ( रा.माड छत्तीसगड), विज्जू (रा. बस्तर एरीया छत्तीसगड) यांचा समावेश आहे. या सर्वांवर ३०० हून अधिक गंभीर गुन्हे असून महाराष्ट्र शासनाचे ८६ लाख तर छत्तीसगड सरकारचे १ कोटींहून अधिक बक्षीस होते. २०२१ रोजी झालेल्या मार्दीनटोला चकमकीनंतर गडचिरोली पोलिसांना मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. या चकमकीनंतर कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलम पूर्णपणे संपला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०२१ पासून गेल्या तीन वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईत ८० नक्षलवादी ठार झाले. तर १०२ जणांना अटक करण्यात आली. यादरम्यान २९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पत्रपरिषदेला विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश उपस्थित होते.

हेही वाचा – अकोला : व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या वडिलांना जिवंत जाळले

कुख्यात योगेश तुलावीला ठार करण्यात यश

चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये १६ लाख बक्षीस असलेला चातगाव-कसनसूर संयुक्त दलमप्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय याचा समावेश असून त्याच्यावर हत्या, चकमक, जाळपोळ प्रकरणात एकूण ६७ गुन्हे दाखल होते. पोलीस दरबारी कुख्यात नक्षलवादी अशी नोंद असलेल्या योगेशचा अनेक चकमकीत सहभाग होता. त्याच्या मृत्यूने उत्तर गडचिरोलीतील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले आहे.

Story img Loader