Gadchiroli Naxal Attack: छत्तीसगड सीमेवरील नक्षलप्रभावित भामरागड येथे पर्लकोटा नदीजवळ नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथे स्फोट झाल्याची घटना १६ नोव्हेंबरला सकाळी उजेडात आली. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उद्या गृहमंत्री अमित शहा प्रचारसभेसाठी गडचिरोली येत आहेत. नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीवरी नवीन पूल बनत आहे. त्यासाठी तेथे काही मजूर काम करतात. या पुलाशेजारी रात्री मोठा आवाज झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, सकाळी पोलिसांनी तपासणी केली असता स्फोटाच्या ठिकाणी चुन्याने ओढलेल्या रेषा दिसून आल्या. या परिसरात सध्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. नक्षली अनेकदा जमिनीत स्फोटके पेरुन ठेवतात, त्यानंतर स्फोट घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा धोका नको म्हणून पोलिसांनी परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केली जात असून या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तूर्त या मार्गावरील वाहतूक देखील रोखून धरली आहे. भामरागड हा छत्तीसगडला चिकटून असलेला परिसर आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Chhagan Bhujbal On Manoj Jarange
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटलांची एंट्री, येवलेकरांनी केले जंगी स्वागत

हेही वाचा : Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप

गेल्या काही दिवसांत पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्याने नक्षल्यांची काहीशी पिछेहाट झाली आहे. मात्र, अधूनमधून त्यांच्या कुरापती सुरु असतात. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याआधी स्फोट घडवून नक्षल्यांनी सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिल्याचे पाहावयास मिळत आहे.

गृहमंत्र्यांचा इशारा अन् स्फोटाच्या योगायोगाची चर्चा

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी १५ नोव्हेंबरला चंद्रपूरच्या सभेत गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आला. ३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधील नक्षलवाद संपवू अशी घोषणा केली. सोबतच उद्या १७ नोव्हेंबरला ते गडचिरोलीत येणार आहेत. या घोषणेनंतर काही तासांतच भामरागडमधून स्फोटाची बातमी आली. त्यामुळे गृहिमंत्र्यांचा नक्षल्यांना इशारा अन् स्फोटाची घटना या योगायोगाची चर्चा होत आहे.

हेही वाचा : रवी राणांच्‍या विरोधात बच्‍चू कडूंची पत्‍नीही मैदानात

सर्च ऑपरेशन सुरू

नक्षलप्रभावित भामरागडजवळील पर्लकोटा नदीवरी नवीन पूल बनवला जात आहे. त्यासाठी तेथे काही मजूर काम करतात. या पुलाशेजारी स्फोट घडल्याची खात्री केली आहे. त्यात तथ्य आहे. या स्फोटाबद्दल अधिक चौकशी सुरू आहे. परिसरात शोधमोहीम सर्च ऑपरेशन सुरू आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पोलीस यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.