गडचिरोली : वादग्रस्त कारकिर्दीमुळे चर्चेत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुडे यांच्याकडे पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा प्रभार देण्यात आल्याची बाब ‘लोकसत्ता’ने उजेडात आणताच तीन दिवसात प्रशासनाने निर्णय बदलून वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. माधुरी किलनाके यांच्याकडे जबाबदारी सोपवली. यामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्तीच्या मुदतवाढीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) नागपूर येथे दाद मागितली होती. मात्र, २९ जुलै २०२४ रोजी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे जागा रिक्त झाली होती. डॉ. माधुरी किलनाके या वर्ग १ अधिकारी असतानाही त्यांना डावलून वर्षभरापूर्वीच निवृत्त झालेले व विशेष बाब म्हणून पुन्हा सेवेत आलेले रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुडे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, सर्जन व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन डॉ. रुडे हे लगबगीने जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीत बसले होते.
हेही वाचा – गडचिरोली : पोलीसच बनले वऱ्हाडी! आत्मसमर्पित नक्षलवादी ‘रजनी’ शेतकरी तरुणासोबत लग्नबंधनात
डॉ. रुडेंविरुद्ध उपसंचालकांकडे तक्रारी होत्या. तसेच गोंदियातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशा अपूर्ण असताना जिल्हा शल्यचिकित्सक हे कार्यकारी पद त्यांनी कोणाच्या आशीर्वादाने मिळवले, असा प्रश्न होता.
‘लोकसत्ता’ने १४ ऑगस्ट रेाजी वृत्त प्रकाशित करुन याकडे लक्ष वेधले होते. यानंतर आरोग्य विभागाने १६ ऑगस्ट रोजी डॉ. माधुरी किलनाके यांची विनंतीनुसार गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती केली. आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांनी या नियुक्ती आदेशानुसार डॉ. रुडे यांना मूळ पदावर पाठवून डॉ. माधुरी किलनाके यांनी पदभार स्वीकारण्याचे आदेश काढले. डॉ. रुडे जिल्हा शल्यचिकित्सक पदावर असताना त्यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले होते. वादग्रस्त शैलीमुळे ते कायम चर्चेत होते. याविषयी राजकीय पक्षांनी अनेकदा आक्षेप घेतला होता, हे विशेष.
काँग्रेसचे आंदोलन
१६ ऑगस्ट रोजी दुपारी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर यांनी शहरातील इंदिरा गांधी चौकात डॉ. अनिल रुडे हटाव… जिल्हा रुग्णालय बचाव.. अशी घोषणाबाजी करुन निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन दिले. हे आंदोलन झाल्यानंतर तासाभरातच डॉ. रुडे यांना हटविल्याचे आदेश धडकले.