जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धुडेशिवणी जंगल परिसरात खुशाल निकुरे (६०) या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. व्याघ्र हल्ल्यातील मृत्यूची ४८ तासातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे.

धुडेशिवणीच्या जंगलात दुपारी दोन वाजताच्या सुमारास खुशाल निकुरे हा दोन साथीदारांसाबत गुरे चराईसाठी गेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वाघाने हल्ला करताच दोन्ही सहकारी पसार झाले. या घटनेची माहिती वनखात्याला मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Story img Loader